Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एनसीसीमध्ये मुलींनी प्रवेश घेतल्यास करीयर घडविता येते : कु. आयुषी भांड

गोंदवले / वार्ताहर : बिदाल, ता. माण येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या तर्फे विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थांचा सत्कार समारंभ व

एकत्र लढलो असतो तर सत्ता आली असती : ना. जयंत पाटील
खटाव तालुक्यात गौण खनिज उत्खनन प्रकरणी जेसीबीसह दोन ट्रॅक्टरवर कारवाई
सीमा प्रश्‍नाबाबत सर्वोच्च न्यायालयात मांडण्याच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा : ना. शंभूराज देसाई

गोंदवले / वार्ताहर : बिदाल, ता. माण येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या तर्फे विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थांचा सत्कार समारंभ व कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी शासकीय अभियंत्रिकी महाविद्यालय पुणे येथे शिकत असलेली बिदाल, ता. माण येथील साहेबराव भांड यांची नात व पुणे येथे लेखाधिकारी असलेले संतोष भांड यांची कन्या कु. आयुषी संतोष भांड हिची एनसीसी (वायुसेना) मधील रायफल शूटिंग या खेळा करीता महाराष्ट्र संघात मुलीमधून तिची एकटीची निवड झाली होती. त्यानंतर अखिल भारतीय एनसीसी वायुसेना यांच्या स्पर्धा जोधपुर, राजस्थान येथे झाल्या. यामध्ये रायफल शूटिंगमध्ये कु. आयुषी भांड हिने भारतात प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या या यशाच्या प्रित्यर्थ बिदाल ग्रामस्थांनी तिचा व तिच्या आई-वडीलांचा, आजोबांचा सन्मान करण्यात आला.
सत्कार प्रसंगी कु. आयुषी भांड बोलत होती ती पुढे म्हणाली, मुलींनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या अंगी आसणार्‍या विविध सुप्त गुणांना चालना दिली पाहिजे. दैदिप्यमान किर्ती मिळवुन आपल्या गावचे घराचे नाव रोषण करावे. सद्या एनडीए व वायुसेना, एनसीसी अशी कितीतरी असंख्य क्षेत्रे आहेत. त्यामध्ये प्रवेश घेऊन करियरला चालना द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करून ग्रामस्थांचे व ग्रामपंचायतीचे आभार मानले.

COMMENTS