Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हातचलाखीने बदलले कार्ड, खात्यातून काढले 43 हजार

अहमदनगर/प्रतिनिधी - हात चलाखीने एटीएम कार्ड बदलून खात्यातील 43 हजार 360 रुपयांची रक्कम काढून घेत एका नोकरदाराची फसवणूक केली गेली. नगर-मनमाड रोडवर

विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लिहिले रक्ताने पत्र
चंद्रदर्शन झाल्याने आजपासून रमजान उपवासांना प्रारंभ
पोलिस ठाणे व कर्मचार्‍यांच्या निवास स्थानासाठी निधी द्या

अहमदनगर/प्रतिनिधी – हात चलाखीने एटीएम कार्ड बदलून खात्यातील 43 हजार 360 रुपयांची रक्कम काढून घेत एका नोकरदाराची फसवणूक केली गेली. नगर-मनमाड रोडवरील कोहिनूर मॉल शेजारी ही घटना घडली. दिलीप दासराव चिरके (वय 59, रा. सुभाषनगर, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे फसवणूक झालेल्या नोकरदाराचे नाव आहे. त्यांनी यासंदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

चिरके हे शनिवारी सायंकाळी नगर-मनमाड रोडवरील एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. ते एटीएम मशीनमध्ये पैसे काढत असताना दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्या दिलीप यांना म्हणाल्या,‘लवकर पैसे काढा, तुम्ही चुकीचे बटन दाबत आहात’, असे म्हणून त्या व्यक्तीने दिलीप यांचे मशीनमधील एटीएम कार्ड काढून घेत हात चलाखीने दुसरे एटीएम कार्ड त्यांना दिले. ते एटीएम कार्ड घेऊन सोलापूर येथे घरी गेल्यावर त्यांना एटीएम कार्ड बदलून आल्याचे लक्षात आले. तोपर्यंत त्यांच्या खात्यातून 43 हजार 360 रुपये काढून घेतल्याचा मेसेज त्यांना मोबाईलवर प्राप्त झाला होता. चिरके यांनी पुन्हा नगरला येऊन तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका आठरे करीत आहेत.

COMMENTS