बीड प्रतिनिधी - महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या समाजसेविका व संस्थांची दाद व्हावी तसेच समाजसेविका व संस्थांना पुढे प्रे
बीड प्रतिनिधी – महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या समाजसेविका व संस्थांची दाद व्हावी तसेच समाजसेविका व संस्थांना पुढे प्रेरणा मिळावी, त्याच्या समाजसेवेची प्रशंसा व्हावी, जेणे करुन महिला व बालकांच्या उन्नतीसाठी समाजसेविका व संस्थांनी पुढाकार घ्यावा या साठी महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या समाजसेविका व संस्थांना राज्यशासनाकडुन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर देण्यात येतो. सन सन 2020-21, 2021-22, 2022, 23 व 2023-24 या वर्षा करीता सदर पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात राज्यस्तरासाठी किमान 25 वर्षे, विभागस्तरासाठी किमान 10 वर्षे व जिल्हा स्तरावर किमान 7 वर्षे कार्य केलेले असावे.
अशा महिला समाजसेविका व संस्था यांचेकडुन प्रस्ताव मागविण्यात येत आहे. या पूर्वी सावित्रिबाई फुले अथवा दलित मित्र पुरस्कार मिळालेला नसेल अशा महिला समाजसेविका सदर पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करु शकतात. अर्जदार महिलेचे कार्य जात, धर्म, पंथ आणि राजकीय पक्षाशी संबंधित नसावी. तरी बीड जिल्ह्यातील पात्र समाजसेविका व संस्था यांनी आपले सन 2020-21, 2021-22, 2022,23 व 2023-24 या वर्षातील प्रस्ताव जिल्हा विभाग आणि राज्यस्तावरील पुरस्कारासाठी विहित नमुन्यात दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंत या कार्यालयास 3 प्रतीत सादर करावेत. कार्यालयाचा नाव व पत्ता :- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पत्ता:- वरद प्राईड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, धानोरा रोड, बीड जि.बीड. दु.क्र. 02442-230493
COMMENTS