Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराला वेग

23 किंवा 24 मे रोजी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येवून तब्बल 10 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झाले

ईडीच्या अधिकार्‍याला 20 लाखाची लाच घेतांना अटक
वीजपंप चोरणारे कर्जत पोलिसांकडून जेरबंद
अगस्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्मरणिका होणार प्रकाशित

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येवून तब्बल 10 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. सत्ता संघर्षाचा निकाल आल्यानंतर तरी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी अटकळ बांधली जात होती, मात्र न्यायालयाच्या निकालानंतर देखील अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मात्र आगामी निवडणुका ताकदीवर लढण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार आगामी काही दिवसांमध्ये होणार असून, त्याला भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार येत्या 23 किंवा 24 मे रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  
शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपद मिळवण्यासाठी इच्छूक आहेत, मात्र संख्याबळाचा विचार करता, अनेकांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे शिंदे गटात नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. मात्र, त्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 20 जणांनाच मंत्रिपदे देण्यात आली आहेत. शिंदे गट आणि भाजपचे अनेक जण उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दोन्ही बाजूंकडून एकाही महिलेचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आलेला नाही. त्यामनुळे दोन्ही बाजूंनी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीपर्यंत होण्याची शक्यता आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मुंबई आणि पुण्याच्या दौर्‍यात त्यांनी निवडणुकांच्या कमाला लागण्याचे आदेश कार्यकर्ते, नेत्यांना दिले आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील 14 महापालिका, 207 नगरपंचायती, 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. यात शिंदे गट आणि भाजपा पक्षाच्या नेत्यांना बळ देण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची गरज असल्याचे नड्डा यांना शिंदे- फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे. नड्डा यांनीही विस्ताराला हिरवा कंदील दाखवल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या 10 ते 11 दिवसांत मे अखेरीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

नाराजी रोखण्याचे मोठे आव्हान- राज्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या दोघांवरही आपल्या पक्षातील आमदार नाराज होणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्यावी लागणार आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळवून देण्यासाठी ते पक्षाची रणनीती आखतांना दिसून येत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात आपल्या पक्षाच्या नेत्यांना जास्त संधी देण्याचा आणि त्यांना बळ देण्याचा प्रयत्न फडणवीस करतील. त्याचबरोबर नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचे आव्हान देखील त्यांच्यासमोर असणार आहे.

भाजपचे इच्छूक आमदार
1. संजय कुटे
2. जयकुमार रावल
3. पंकजा मुंडे
4. माधुरी मिसाळ
5. किसन कथोरे
6. राणा जगजितसिंह पाटील
7. नितेश राणे
8. प्रशांत ठाकूर
9. योगेश सागर

शिंदे गटातील इच्छूक आमदार
1. संजय शिरसाट
2. योगेश कदम
3. भरत गोगावले
4. प्रकाश आबिटकऱ
5. बालाजी किणीकऱ
6. बच्चू कडू

COMMENTS