पुण्याहून नांदेडला निघालेल्या बसला अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्याहून नांदेडला निघालेल्या बसला अपघात

या अपघातात 24 जण जखमी तर चार जण गंभीर जखमी

बीड प्रतिनिधी :  नगर- बीड महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास खासगी बसला झालेल्या अपघातात 24 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामधील चार प्रवाशांची प्रकृत

पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात दोघांचा मृत्यू
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

बीड प्रतिनिधी :  नगर- बीड महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास खासगी बसला झालेल्या अपघातात 24 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामधील चार प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नगर- बीड महामार्गावरील बीडच्या पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी जवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. पुणे येथून नांदेडला जाणारी बस क्रमांक मेंद्रेवाडी शिवारात पहाटेच्या सुमारास बीडकडे येत होते. मेंद्रेवाडी हद्दीत बस येत असताना डोंगरात वळणावर तिचा अपघात झाला. हा अपघात चालकाचा ताबा सुटल्याने झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातानंतर पाटोदा पोलिस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती.

COMMENTS