हिंदूत्ववाद्यांना हटवून हिंदूना सत्तेत आणा : राहुल गांधी यांचे आवाहन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदूत्ववाद्यांना हटवून हिंदूना सत्तेत आणा : राहुल गांधी यांचे आवाहन

जयपूर : हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून हा देश देश हिंदूंचा होता, हिंदुत्ववाद्यांचा नाही. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना हटवून हिंदू

नाशिक लोकसभेसाठी 500 उमेदवार देणार; मराठा समाजाचा निर्धार 
‘मविआ’ सोबत दिसणार वंचित बहुजन आघाडी
वर्षभरात 92 टक्के गुन्हे उघड,जिल्हा पोलीस दलाची दमदार कामगिरी 

जयपूर : हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून हा देश देश हिंदूंचा होता, हिंदुत्ववाद्यांचा नाही. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना हटवून हिंदूना सत्तेत आणा, असे आवाहन काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी जयपूरमध्ये आयोजित काँगे्रसच्या महारॅलीला संबोधित करतांना केले. या रॅलीत बर्‍याच कालावधीनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधीही यावेळी उपस्थित होत्या.
तुम्ही सर्वजण हिंदू आहात. हिंदुत्ववादी सत्तेचे भुकेला आहेत. 2014मध्ये हिंदुत्वावादी सत्तेत आले. पण हिंदू आजही सत्तेपासून दूर आहे. आपल्याला या हिंदुत्ववाद्यांना हटवून हिंदूंना सत्तेत आणायचे आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. हिंदू सत्यासाठी मरत असतो. सत्य हाच त्याचा मार्ग आहे. तो जीवनभर सत्याच्या शोधात असतो. महात्मा गांधींचे संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधात गेले. हिंदुत्ववादी गोडसेने त्यांच्या छातीत तीन गोळ्या घातल्या. हिंदुत्ववाद्यांना सत्याशी काही घेणे देणे नाही. हिंदू हा सत्याचा शोध घेत असताना कधीच कुणापुढे झुकत नाही. मात्र, हिंदुत्ववादी हा सदा द्वेषाने पछाडलेला असतो. कारण त्याच्या मनात भीती असते, असे राहुल गांधी म्हणाले. आपल्याला घाबरवले जाऊ शकत नाही. आम्ही मृत्यूला घाबरत नाही. हिंदुत्ववाद्यांना फक्त आणि फक्त सत्ता हवी आहे. त्यांना सत्य नको आहे. त्यांचा मार्ग सत्याग्रहाचा नाही. तर सत्ता ग्रहचा आहे. हिंदू नेहमीच भयाशी संघर्ष करत असतो. ते महादेवाप्रमाणे भयाचे प्राशन करतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गांधी आणि गोडसेंमधील फरकही समजावून सांगितला. हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन शब्दांची आत्मा एक सारखी असूच शकत नाही. मी हिंदू आहे. पण हिंदुत्ववादी नाही. या देशात या दोन शब्दांचा संघर्ष आहे. एक शब्द आहे हिंदू आणि दुसरा आहे हिंदुत्ववादी आहे. हे दोन्ही शब्द एक नाहीये. हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. महात्मा गांधी हिंदू होते, तर गोडसे हिंदुत्ववादी होता, असेही त्यांनी सांगितले.

मोदी सरकारचे काम फक्त उद्योगपतींसाठी : प्रियंका गांधी
काँगे्रसच्या महारॅलीला संबोधित करतांना काँगे्रसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी देखील केंद्र सरकारवर सडकून टीका केली. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, ’काँग्रेसने 70 वर्षांत काय केले, असे विचारणार्‍यांना मला विचारायचे आहे की, 70 वर्षांची ही चर्चा सोडा. गेल्या सात वर्षांत तुम्ही काय केले? एम्स, जिथून तुमचे विमान उडते ते विमानतळ देखील काँग्रेसने बांधले. काँग्रेसने 70 वर्षात जे निर्माण केले ते भाजपा सरकार विकत आहे. हे सरकार फक्त उद्योगपतींसाठी काम करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

COMMENTS