Homeताज्या बातम्यादेश

ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापले

भाजपने मुलाला दिली कैसरगंत मतदारसंघातून उमेदवारी

नवी दिल्ली ः भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तुपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. याप्रकरणामुळे ते वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. या

व्यंकटेश पतसंस्थाच्या दोन संचालक गजाआड ; २ कोटी अफरातफर घोटाळा प्रकरण
बाहुबली देणार ‘भाईजान’ ला टक्कर
’जीएसटी’मधून मिळाला रेकॉर्डब्रेक महसूल

नवी दिल्ली ः भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तुपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. याप्रकरणामुळे ते वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. या सर्व आरोपांनंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र तरीही ब्रिजभूषण यांच्यामागील शुक्लकाष्ट संपले नसून, भाजपने त्यांचे लोकसभेचे तिकीट कापले असून, त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे.
भाजपकडून उत्तर प्रदेशच्या दोन प्रमुख मतदार संघातील उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा धक्का बसला आहे. कैसरगंज लोकसभा मतदारसंघात भाजपने ब्रिजभूषण शरण सिंह यांचा पत्ता कट करत त्यांचा मुलगा करण भूषण सिंहला उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे हा ब्रिजभूषण यांना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. तर भाजपने रायबरेली मतदारसंघातून दिनेश प्रताप सिंह यांना तिकीट दिले आहे. भाजपकडून नुकताच उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघ आणि कैसरगंज मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी भाजपने उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. परिपत्रक जारी करत भाजपने कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून करण भूषण सिंह आणि रायबरेली मतदारसंघात दिनेश प्रताप सिंह यांना तिकीट दिल्याची माहिती सांगितली. उद्या हे दोन्ही उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपने ब्रिजभूषण सिंह यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. ब्रिजभूषण यांचा मुलगा करणला भाजपकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. करण भूषण सिंह हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. याआधी त्यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तुपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. याप्रकरणामुळे ते वादाच्या भोवर्‍यात सापडले होते.

COMMENTS