Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर बसस्थानकात शिवशाही बसचा ब्रेक निकामी

कोल्हापूर / प्रतिनिधी : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आज शिवशाही बसचा अचानक ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. गजबजलेल्या परिसरात मात्र, सुदैवाने कोण

माजी मंत्री शिवाजीराव नाईक स्वगृही; हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत दाखल; भाजपला मोठा धक्का
सातार्‍यातील महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रमाची आता राज्यभरात अंमलबजावणी : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांना यश
विधानसभे पाठोपाठ जिल्हा बँकेतही आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव; कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या सातारा कार्यालयावर दगडफेक

कोल्हापूर / प्रतिनिधी : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आज शिवशाही बसचा अचानक ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. गजबजलेल्या परिसरात मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमध्ये सात वाहनांचे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-कोल्हापूर-पणजी शिवशाही बस प्रवासी घेऊन मध्यवर्ती बसस्थानकातून पणजीकडे दुपारी साडेतीनच्या सुमारास रवाना होत होती.
दाभोळकर कॉर्नरच्या दिशेने जात असताना बस प्रवासी घेण्यासाठी थांबली. त्याचवेळी अचानक बसचा ब्रेक निकामी झाला. तशी बस पाठीमागे जाऊ लागली. गजबजलेल्या ठिकाणी घडलेली ही घटना पाहून परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला. तशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने ती बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला. पाठीमागील नागरिकांना बाजूला होण्याच्या सूचना करण्यास सुरवात केली. त्याचेवळी पाठीमागून एक स्कूलबस येत होती. चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला असणार्‍या चेंबर्सच्या दिशेने वळवली.
ती येथील एका बंद असणार्‍या गाळ्यावर नेऊन थांबवली. मात्र, या अपघातात चार मोटारसायकल आणि एका मोटारीचे मोठे नुकसान झाले. अन्य दोन मोटारसायकललाही धडक बसली. अपघाताची माहिती परिसरात पसरली. तशी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. शाहूपुरी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहनांसह प्रवाशांची मोठी वर्दळ असते. आजही तीच परिस्थिती होती. याच ठिकाणी बसचा ब्रेक फेल झाला. पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. चालकाचे परिसरात कौतुक होत होते.

COMMENTS