Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोपदेव घाट सामूहिक बलात्कारातील आरोपींना अटक

पुणे : सासवडच्या दिशनेने जाणार्‍या बोपदेव घाटात रात्री फिरावयास गेलेल्या तरूणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवून तिच्या मित्राला बांधून त्

पदरावर महालक्ष्मीचा मुखवटा असणारी आकर्षक पैठणी   
चित्रपटगृहे, नाट्यगृहांच्या रंगभूमी करात वाढ
पंतप्रधान मोदींसह शहांना जीवे मारण्याची धमकी
मोठी बातमी! पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन संशयितांना  पोलिसांनी केली अटक; चौकशी सुरू-pune bopdeo ghat gang rape case pune police  arrest ...

पुणे : सासवडच्या दिशनेने जाणार्‍या बोपदेव घाटात रात्री फिरावयास गेलेल्या तरूणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवून तिच्या मित्राला बांधून त्या 21 वर्षीय तरूणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गेल्या कित्येक दिवसांपासून शोध घेतल्यानंतर देखील आरोपी सापडत नव्हते, अखेर पोलिसांनी शुक्रवारी या तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याप्रकरणातील आरोपी मिळण्यासाठी सात दिवस पोलिस अथक प्रयत्न करत होते परंतु आरोपीं त्यांना मिळून येत नव्हते. मात्र,पारंपारिक पध्दतीने तपास करताना, सदर आरोपींबाबत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली तसेच येवलेवाडीत एका दारुच्या दुकानातून दारु खरेदी करताना तीन संशयित सीसीटीव्हीत कैद झाले. त्यानंतर त्यांचा माग काढत सुरुवातीला एक आरोपी येवलेवाडी परिसरात मिळून आला. त्यानंतर त्याचे दोन साथीदार नागपूर येथे पसार झाल्याचे समजल्यावर पोलिसांनी सदर दोघांचा शोध घेऊन त्यांना देखील जेरबंद केले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी या गुन्ह्या्चा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची 30 पथके व इतर 30 पथके अशी एकूण 60 पथके कार्यरत केली होती. त्याशिवाय जुने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची देखील मदत घेऊन त्यांना तपास कामात सक्रिय केले. सदर घटना ही अमावस्येच्या दुसर्‍या दिवशी घडल्याने घाट परिसरात सदर जागी रात्री अंधार असल्याने आरोपींना पाहणारे प्रत्यक्षदर्शी इतर कोणीच नव्हते, मोबाईल नेटवर्क नसल्याने तांत्रिक तपास पोलिसांना करता आला नाही. घाट परिसरात सीसीटीव्ही कुठे नसल्याने व जे उपलब्ध सीसीटीव्ही होते त्याची दृश्यमानता स्पष्ट नसल्याने तपासात अडथळे जाणवले. आरोपींनी पिडित तरुणी व तिच्या मित्राचे मोबाईल सुरुवातीला घेऊन जाताना परत त्यांना केले होते तसेच त्यांना शस्त्राचा धाक दाखवून धमकावत घटनास्थळावरुन आम्ही गेल्यानंतर 15 मिनिट बाहेर याव्याचे नाही असे बजावल्याने आरोपी नेमक्या कोणत्या दिशेला पळून गेले याचा थांगपत्ता लागत नव्हता.

COMMENTS