श्रीरामपूर ः आजच्या तंत्रप्रधान युगात पुस्तकाकडे दुर्लक्ष होत आहे, अशा परिस्थितीत वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सातत्याने पुस्तक परिसंवाद, मेळावे
श्रीरामपूर ः आजच्या तंत्रप्रधान युगात पुस्तकाकडे दुर्लक्ष होत आहे, अशा परिस्थितीत वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सातत्याने पुस्तक परिसंवाद, मेळावे, प्रकाशने, ग्रंथनिर्मिती तसेच वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकेभेट उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी काढले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे ग्रंथभेट आणि वाचनप्रेरणा उपक्रमांच्या निमित्ताने लोणी, माळेवाडी, उंदीरगाव आदी ठिकाणी झालेल्या उपकमात प्राचार्य टी.ई. शेळके बोलत होते. लोणी येथील एका कार्यक्रमात प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्राचार्य डॉ. केशवराव देशमुख, प्रा. बाबा खरात, प्रा.चंद्रकांत देशमुख, व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर, माळेवाडी येथील जालिंदर औताडे, सौ. सुमनताई औताडे, रामेश्वर औताडे, उंदीरगाव येथील बबनराव वैद्य, सदाशिव आव्हाड, शिवाजीराव गलांडे, इत्यादींना डॉ. उपाध्ये यांनी अनेक पुस्तके भेट दिली. यावेळी प्राचार्य शेळके, प्रा. शिवाजीराव बारगळ हे उपस्थित होते. संयोजक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी गावोगावी झालेल्या उपक्रमात पुस्तके व मान्यवर परिचय करून देऊन वाचन संस्कृती घराघरात जाणे गरजेचे असल्याचे सांगितले. या उपक्रमासाठी साहित्यिक डॉ. शिवाजी काळे, प्राचार्य शंकरराव अनारसे,प्राचार्य मंगलताई पाटील, प्रा. दिलीप सोनवणे, दत्तात्रय रसाळगुरूजी, डॉ. अशोकराव सोनवणे, डॉ. दादासाहेब गलांडे इत्यादींनी अनेक पुस्तक दिली, त्याबद्दल डॉ. उपाध्ये यांनी सर्वांचे कौतुक केले. प्रा. बारगळ यांनी विविध पुस्तकांचे महत्त्व सांगत या वाचन चळवळीत युवकांनी योगदान द्यावे असे आवाहन करत आभार मानले.
COMMENTS