Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकच्या सकल मराठा बांधवांकडून सरकार विरोधात बोंबाबोंब आंदोलन  

नाशिक प्रतिनिधी - गोरगरीब मराठा यांचे ओबीसी आरक्षण मार्गी लागावे या हेतूने पुन्हा जरांगे पाटील उपोषणास बसले असून आज त्यांचा पाचवा दिवस आहेत मा

‘पुन्हा लॉकडाऊन झाल्यास कष्टकरी उपासमारीने मरतील’
भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न
शिराळा तालुक्यात लॉकडाउननंतर पहिल्या कुस्ती मैदानास प्रारंभ

नाशिक प्रतिनिधी – गोरगरीब मराठा यांचे ओबीसी आरक्षण मार्गी लागावे या हेतूने पुन्हा जरांगे पाटील उपोषणास बसले असून आज त्यांचा पाचवा दिवस आहेत मात्र सरकारने आपली फसवणुक करून समाजाची सरकार दिशाभूल करत आहेत. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मागील पाच दिवसापासून अन्न व जल त्याग करत आमरण उपोषण अंतरवाली सराटी या ठिकाणी करत आहे.त्या उपोषणाची दखल राज्य सरकारकडून घेतली जात नसल्याने राज्य सरकारच्या विरोधात आज नाशिक येथील शिवतीर्थ या ठिकाणी सकल मराठा समाज नाशिक ने बोंबाबोंब आंदोलन करत राज्य शासना विरोधात निषेध करत रोष व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व मंत्रिमंडळाने मराठा योद्धा जरांगे पाटील यांना वाशी नवी मुंबई मध्ये मोर्चा मध्ये सगेसोयरे हा कायदा बनून मराठा समाजाला सरसकट ओबीसीत समावेश करू व आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवू या संदर्भातला पक्का मसुदा घेऊन येत तेथील व्यासपीठावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना शब्द दिला होता की पुढील महिन्यात पंधरा तारखेला राज्य सरकारच्या वतीने विशेष अधिवेशन घेऊन त्यात हा मसुदा कायद्यात रूपांतर करण्यात येईल व मराठा आरक्षण कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल या आशेने मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या अंगावर गुलाल टाकण्यात आला. त्याचबरोबर पेढे भरवत त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे तलवार भेट दिली.या सगळ्या गोष्टींची मुख्यमंत्री यांनी जाणीव ठेवून मराठा समाजाला फसवणार नाही या गोष्टीचा शब्द सर्व समाज बांधवांसमोर म्हणून जरांगे पाटील यांना दिला.राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही सांगितलं की मी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली असून मराठा समाजाशी कधीही गद्दारी किंवा फसवणूक करणार नाही परंतु आज मुख्यमंत्री महोदय व राज्य सरकार या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचे सरळ सरळ दिसत आहे. मुख्यमंत्री महोदय आपल्यावर मराठा समाजाचा विश्वास आहे त्या समाजाला आपण न्याय द्या दिलेला शब्दाला जागा अशा आव्हान  मराठा समाजाच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती इतकी खालावलेली असताना सुद्धा राज्य सरकार कुठलीही पाऊल उचलत नाही,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावर एक शब्दही बोलत नाही या सर्व गोष्टींचा सकल मराठा समाज नाशिक निषेध करत व राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,गृहमंत्री यांना सकल मराठा समाजाच्या वतीने इशारा देण्यात येतो की आज संध्याकाळपर्यंत मराठा योद्धा जरांगे पाटील यांचे उपोषण जर आपण त्यांच्या मागण्या मान्य करून सोडवले नाही तर उद्यापासून महाराष्ट्रात याचे उद्रेक आपल्याला दिसेल व यातून जे काही परिणाम होतील या सर्वस्वी जबाबदार आपण असाल याचीही आपण नोंद घ्यावी असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने आज देण्यात आला.

 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण वाशी मार्केट नवी मुंबई येथे मराठा समाजाच्या व्यासपीठावर दिलेला शब्द पाळला नाही तर उद्यापासून महाराष्ट्रातील एकही खासदार आमदार मंत्री यांना रस्त्यावर मराठा समाज फिरू देणार नाही,मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या केसाला थोडा जरी धक्का लागला तर महाराष्ट्राची परिस्थिती बिघडवायला मराठे आता मागेपुढे बघणार नाही त्यामुळे आपण तात्काळ आजच्या मंत्रिमंडळ बैठकित मराठा समाजाचा प्रश्न निकालीत काढून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन थांबवा अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरे जायला तयार रहा असा इशारा

– करण पंढरीनाथ गायकर

मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक – मराठा समाजाच्या भावना तीव्र असून राज्य सरकारने आता वेळ काढू पणा करू नये 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाचा जो मसुदा तयार केला आहे तो कायद्यात रूपांतरित करू व मराठा समाजाला न्याय देऊ ही भूमिका घेतली असताना आज त्यामध्ये चालढकल करून सरळ सरळ समाजाची दिशाभूल करण्याचं काम आपण करत आहात,हे कदापि मराठा समाज आता खपवून घेणार नाही.आज शांत असलेले मराठे उद्या आक्रमक झाले तर याला जबाबदार फक्त आणि फक्त राज्याचे मुख्यमंत्री,मंत्री मंडळ आणि आमदार खासदार असतील याची नोंद घ्यावी.उद्यापासून गाव बंदी शहर बंदी याचाही निर्णय समाजाच्या वतीने घेण्यात येईल 

नानासाहेब बच्छाव उपोषणकर्ते नाशिक – या प्रसंगी करण गायकर,नानासाहेब बच्छाव,चंद्रकांत बनकर,नितीन रोटे पाटील,ज्ञानेश्वर कवडे,योगेश नाटकर,राजेंद्र शेळके,विकी गायधनी,वैभव दळवी,संदीप फडोळ,नितीन पाटील,कृष्णा धोंडगे,भारत पिंगळे,चेतन शेलार, रेखा पाटील,मनोरमा पाटील,संगीता सूर्यवंशी,अड स्वप्न राऊत,सविता वाघ,दिपाली लोखंडे,योगिता पाटील,रोहिणी उखाडे,मंगेश पाटील,अजय काळे,सुधाकर चांदवडे,सागर वाबळे,हर्षल पवार,रमेश खापरे,हिरामण वाघ,नितीन खैरनार,मंगेश पाटील,अण्णासाहेब खाडे,अमोल शिंदे,संदीप हांडगे,राम निकम,संदीप खुटे,सागर फडोळ,शोभाताई सोनवणे,स्वाती कदम,शिवाजी धोंडगे,जगदीश शेजवळ,सुरेश निकम,संपतराव टोपे,आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

COMMENTS