Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी – प्रकाश आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी - मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जारंगे पाटील जालन्यातील आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा त्यांचा आजच

’मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा
वंचितचा काँगे्रसला 7 दिवसांचा अल्टीमेटम
प्रकाश आंबेडकर आज लोकसभेबाबत भूमिका जाहीर करणार ?

मुंबई प्रतिनिधी – मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जारंगे पाटील जालन्यातील आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा त्यांचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान, जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. जरांगे पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी. ते निवडून येतील अशी आमची खात्री आहे. लोकसभेत गरीब मराठ्यांचा प्रश्न मांडता येईल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. विशेष म्हणज वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवणार आहेत. ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. जरांगे पाटील यांनी जालन्यातून लोकसभेची निवडणूक लढवावी. त्यांनी जालन्यातून आपली उमेदवारी जाहीर करावी. त्यांच्याबरोबर आमचे जालन्यातील पदाधिकारी चर्चा करतील. ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचा प्रश्न कायम तेवत ठेवता येईल. लोकसभेच्या माध्यमातूनच तो सोडवता येईल. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. ते आमचा सल्ला मान्य करतील, अशी आमची अपेक्षा आहे.

COMMENTS