Homeताज्या बातम्यादेश

दिल्ली-पुणे विमानात बॉम्बच्या धमकीचा फोन

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून धमकीचे फोन, ई-मेल असतांना, शुक्रवारी सकाळी दिल्लीहून पुण्याकडे जाणार्‍या विमानात बॉम्ब असल्य

जयंत प्रिमियर कबड्डी लिगचे स्व. जगदीशआप्पा पाटील रायडर्स संघ विजेता
खासदार संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ
पेट्रोल-डिझेलचा पुन्हा भडका

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून धमकीचे फोन, ई-मेल असतांना, शुक्रवारी सकाळी दिल्लीहून पुण्याकडे जाणार्‍या विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली. खबरदारी म्हणून तात्काळ विमान आयसोलेशनमध्ये नेण्यात आले. विमानात असलेल्या प्रवाशांना तात्काळ उतरवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साधारण 7 वाजून 45 मिनिटांनी जीएमआर कॉल सेंटरला एक फोन आला. दिल्ली-पुणे विमानात बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे दिल्ली विमानतळावर गोंधळ उडाला. विमान तातडीने आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या उतरवण्यात आले. विमानात तपासणी करण्यात आली. सुरक्षा यंत्रणांतील एका अधिकार्‍याने ही माहिती दिली. युके-971 दिल्लीहून पुण्यासाठी उड्डाण भरणार्‍या विमानात बॉम्ब असल्याची माहिती देणारा फोन जीएमआर कॉल सेंटरला आला. विमानात 100 हून अधिक प्रवासी होते. त्यांना उतरवण्यात आले, असे या अधिकार्‍याने सांगितले. एका अधिकार्‍याने सांगितले की, दिल्ली-पुणे विमानात बॉम्ब असल्याचा फोन आल्यानंतर सुरक्षा एजन्सीद्वारे तपासणीसाठी ते आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. तपासणी केली असता, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. 

COMMENTS