Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूरच्या सीताबर्डीत बॉम्ब ठेवल्याची धमकी

नागपूर ः येथील सर्वात मोठी बाजारपेठ असणार्‍या सीताबर्डी बाजारातील एका दुकानात बॉम्ब ठेवणार असल्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना 112 वर फो

अल्पवयीन मुलाने एक वर्षाच्या निष्पाप मुलीची केली हत्या | LOKNews24
रेल्वेने चिरडल्याने अकरा प्रवाशांचा मृत्यू ; आगीच्या भीतीने प्रवाशांनी मारल्या उड्या
राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग… ३२ नगरसेवकांनी हाती बांधले घड्याळ…

नागपूर ः येथील सर्वात मोठी बाजारपेठ असणार्‍या सीताबर्डी बाजारातील एका दुकानात बॉम्ब ठेवणार असल्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना 112 वर फोन करून दिली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. फोन करणार्‍या व्यक्तीने सीताबर्डी बाजारातील मोदी नंबर 2 व मोदी नंबर 3 बाजार ओळीमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. ही धमकी मिळताच पोलिस नियंत्रण कक्षाने त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस व बॉम्ब शोध पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिथे तपासणी केली असता त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे हा फेक कॉल असल्याचे स्पष्ट केले.

COMMENTS