पुणे : पुण्यात कोरेगाव पार्क येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. 7 मध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्

पुणे : पुण्यात कोरेगाव पार्क येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. 7 मध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पोलीसाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा झालेला नाही. हा घातपात आहे की हत्या या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. दत्तात्रय कुरळे असे या पोलिस अधिकार्याचे नाव आहे. ते पुणे पोलिस दलात मोटर परिवहन विभागात कार्यरत होते. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
COMMENTS