Homeताज्या बातम्याविदेश

नायजर नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 100 जणांचा मृत्यू

 नायजेरिया येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर नायजेरियातील एका लग्न सोहळ्याला गेलेल्या नागरिकांची बोट नदीत उलटली आहे. या दुर्घटनेत जवळपास १०

मुंबईत 25 वर्षीय एअर होस्टेसची निर्घृण हत्या
अहमदनगर : एकाच दिवसात झाले 1338 कोरोना बाधित ; कोरोनाचा विस्फोट
मनरेगा पुन्हा शिफारशीत!

 नायजेरिया येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर नायजेरियातील एका लग्न सोहळ्याला गेलेल्या नागरिकांची बोट नदीत उलटली आहे. या दुर्घटनेत जवळपास १०० व्यक्तींचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. तसेच अनेक व्यक्ती बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नायजर जवळच्या क्वारा राज्य येथे एक नायजर नदी आहे. ही नदी ओलांडून काही नागरिक लग्नाला निघाले होते. मात्र हा लग्नसोहळा त्यांच्या जीवावर बेतला आहे. आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाल्याचे समजले असून मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. नायजेरियातील  नायजर ही सर्वात मोठी नदी  आहे. या नदीतूनच अनेक नागरिक प्रवास करतात. पावसाळ्यात नदीचा प्रवाह जास्त असतो. मात्र येथे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती उपाय योजना नसल्याने वाहून जाण्याच्या अनेक घटना घडत असतात, असं स्थानिक नागरिकांनी म्हटलं आहे. या दुर्घटनेत बचाव कार्य सुरु आहे.

COMMENTS