Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड पोलिसांच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात

75 दात्यांनी केले रक्तदान

जामखेड ः जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने 3 जून रोजी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरास मोठा प्र

केज तालुक्यातील येवता येथे राजमाताअहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त जय मल्हार मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.
म.ज्यो.फुले महाविद्यालयात रक्तदान शिबीर
जैन श्‍वेतांबर संघाच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात

जामखेड ः जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने 3 जून रोजी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला असुन 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त  दि 1 मे रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते मात्र लोकसभा निवडणुकीच्या व्यस्ततेमूळे 1 मे ऐवजी 3 जून रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले.  जामखेड पोलीस स्टेशन व जामखेड होमगार्ड तालुका आयोजित सामाजिक सलोखा रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. रक्तदान शिबीर उद्घाटनप्रसंगी पोलीस निरिक्षक महेश पाटील, सपोनि गौतम तायडे,महिला पोलिस उपनिरीक्षक वर्षा जाधव, नगरसेवक शामिरभाई सय्यद, होमगार्ड समादेशक डॉ सुरेश काशीद आदी मान्यवर उपस्थित होते. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी पोकाँ अविनाश ढेरे, पोकाँ प्रकाश जाधव,पोकाँ योगेश दळवी,  जनकल्याण रक्तपेढीचे  डॉ. ओजस मुनोत, स्मिता बडवे, योगीराज आर्वेल, शंकर खंडागळे, गया चव्हाण, मेघा शिंदे, किशोर यादव, चंद्रकला फंड, बाळासाहेब खरपूडे यांनी विशेष परिश्रम घेतले.  यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते 

COMMENTS