Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उजनीच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचा रास्तारोको

पंढरपूर : उजनी धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी कालव्यातून पाणी सोडावे; या मागणीसाठी सोमवारी सकाळी पंढरपूर- सातारा राष्ट्रीय महामार्गावर उपरी येथे श

नाचताना स्टेजवर पडली गौतमी पाटील
जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
अवैध धंदे चालकांना लातूर पोलिसांचा बसला जोरदार दणका

पंढरपूर : उजनी धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी कालव्यातून पाणी सोडावे; या मागणीसाठी सोमवारी सकाळी पंढरपूर- सातारा राष्ट्रीय महामार्गावर उपरी येथे शेतकर्यांनी रास्तारोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पंढरपूर जिल्ह्यात हवा तसा पाऊस यंदा झाला नाही. यामुळे सध्या पंढरपूर भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती पिके जळू लागली आहेत. पिकांना पाणी आवश्यक असून याकरिता उजनी धरणातून कालव्याद्वारे तातडीने पाणी सोडावे; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

COMMENTS