Homeताज्या बातम्यादेश

पश्चिम बंगालमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट

पश्चिम बंगाल प्रतिनिधी - पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात रविवारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जण ठार तर अनेक जण जखम

नाशिक जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता पदाचा निकाल घोषित
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये सामाजिक उपक्रम
नव्या शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

पश्चिम बंगाल प्रतिनिधी – पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात रविवारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जण ठार तर अनेक जण जखमी झाले. सकाळी दहाच्या सुमारास हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.कोलकात्यापासून उत्तरेला सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या दत्तपुकुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नीलगंजमधील मोशपोल येथील कारखान्यात अनेक लोक काम करत होते अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत तीन मृतदेह सापडले आहेत. स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी मे महिन्यात पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एग्रा येथील एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात असाच स्फोट झाला होता, ज्यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. 

COMMENTS