Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत मॉडेलकडून सेक्स व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग

मॉडेलने 50 जणांना गंडवले; खंडणीखोर टोळीचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईत एका मॉडेलने 50 हून अधिक लोकांना वासनेच्या जाळ्यात अडकवून अश्‍लील व्हिडिओ बनवत त्यांना ब्लॅकमेल करत त्यांच्या कडून मोठी रक्कम वसूल

Beed : एकाच विद्यार्थ्याला मिळाले चक्क ३४ हॉलतिकिटे (Video)
नोटबंदीचा निर्णय वैध !
चांदवड शहरात अग्निशमन गाडी दाखल…भूषण कासलीवाल यांच्या प्रयत्नांना यश… 

मुंबई : मुंबईत एका मॉडेलने 50 हून अधिक लोकांना वासनेच्या जाळ्यात अडकवून अश्‍लील व्हिडिओ बनवत त्यांना ब्लॅकमेल करत त्यांच्या कडून मोठी रक्कम वसूल केली. ही महिला लोकांना आपल्या घरी बोलवायची आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध बनवतांनाचे व्हिडिओ रेकॉर्ड करायची. त्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून या लोकांना ब्लॅकमेल करून खंडणीवसूल केली जात होती. या प्रकारातून या महिलेने तब्बल 35 लाख रुपये गोळा केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या टोळीचा पर्दाफाश कर्नाटक पोलिसांनी केला आहे. पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रार केल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला. तक्रार करणार्‍या व्यक्तीने सांगितले की, नेहा उर्फ मेहर असे आरोपी महिलेचे नाव आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर फिर्यादीची आरोपी तरुणीशी ओळख झाली. यानंतर दोघेही व्हॉट्सअ‍ॅपवर बोलू लागले. दरम्यान, महिलेने सांगितले की, तिचा नवरा दुबईत काम करतो. यानंतर आरोपीने फिर्यादीला घरी बोलावत त्याच्याशी शरीर संबंध ठेवले. त्याचा व्हिडिओ तिने बनवत फिर्यादीला ब्लॅकमेल करत लुबाडले. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, 3 मार्च रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास पीडित फिर्यादी हे आरोपी मेहेरच्या घरी पोहोचले. आरोपीने त्याला बेडरूममध्ये नेले. त्या ठिकाणी त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवत त्याचा व्हिडिओ बनवला. दरम्यान, याच वेळी तिघे त्यांच्या खोलीत शिरले. आणि फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्याच्याकडे 3 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास विवस्त्र करून भर रस्त्यात धिंड काढण्याची धमकी दिली. याला घाबरून फिर्यादीने त्यांना आधी 21 हजार रुपये दिले.

COMMENTS