Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपला चार राज्यात यश; इस्लामपूरात भाजपाचा जल्लोश

इस्लामपूर / प्रतिनिधी : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपुर राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपा पक्षाने घवघवीत यश मिळविले. इस्लामपूर शहर भाजपा व इ

माण तालुक्यात नवजात अर्भकास फेकून दिल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल
कराड अर्बन बँकेचा 105 वा वर्धापनदिन उत्साहात
जावळी तालुक्यात चोरट्यांकडून 21 बंद घरे लक्ष्य : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

इस्लामपूर / प्रतिनिधी : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपुर राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपा पक्षाने घवघवीत यश मिळविले. इस्लामपूर शहर भाजपा व इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांनी इस्लामपूर शहरातील तहसिल कार्यालय परीसरात फटाक्याची आताषबाजी करत जल्लोश केला तर साखर व पेढे वाटप करत आनंद साजरा केला. यावेळी भाजपाच्या अनेक पदाधिकार्‍यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
भाजपचे पदाधिकारी म्हणाले, हा विजय सर्वसामान्य जनतेच्या स्वाभीमानाचा, भाजपा पक्षाच्या विकासात्मक दूरदृष्टीचा, विचाराचा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने देशातील जनतेच्या मनामध्ये स्वाभीमान जागवला आहे. देशाचा सार्वगिण साधलेला विकास व त्यांचे व्हिजन हे देशातील जनतेने स्विकारले असून देशाची विकासात्मक वाटचाल या विजयाने अधिक जोमाने होईल.
गोवा राज्याचे प्रभारी म्हणून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते ना. देवेंद्र फडणवीस यांनी मोठा विजय खेचून आणला. गोव्यातील जनतेने भाजपाचा विचार व व्हिजन स्विकारल्यामुळे मोठ्या यशाचे भाजपाला शिल्पकार बनविले. यापुढे अशीच यशस्वी घोडदोड भाजपा पक्षाची राहील. या यशामुळे भाजपा पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. इस्लामपूर विधानसभा मतदार संघात भाजपा पक्षाचे काम अधिक जोमाने निशिकांत भोसले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असल्याचे अनेकांनी आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी भाजपच्या विजयाच्या घोषणा देऊन परिसर कार्यकर्त्यांनी दणादुण सोडला.
यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे, भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत, वाळवा तालुका भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटन सरचिटणीस संदिप सावंत, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सतेज पाटील, भाजपाचे सरचिटणीस संजय हवालदार, भाजपाचे नेते भास्कर मोरे, प्रविण परीट, संदिपराज पवार, विकास परीट, अक्षय कोळेकर, मुकूंद रास्कर, रामभाऊ शेवाळे, आलताफ तहसिलदार, गौरव खेतमर, आप्पा शिंदे, सुमंत कुलकर्णी, संतोष कबुरे यांच्यासह अन्य पदाधिकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS