Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराचा राजीनामा

गेवराई : मराठा आरक्षणासाठी मराठा नेत्यांकडून राजीनामा सत्र सुरू करण्यात आले असून, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यानंतर गेवराईचे भाजप आमदार लक

केजरीवालांना दिलासा नाहीच
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी बांधला लाकडी सेतू; मोरणा विभागातील गोकुळ धावडे विद्यालयातील शिक्षकांची अनोखी शक्कल
राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मान्यता

गेवराई : मराठा आरक्षणासाठी मराठा नेत्यांकडून राजीनामा सत्र सुरू करण्यात आले असून, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यानंतर गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे. अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रविवारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आमदार लक्ष्मण पवार यांनीही राजीनामा दिला आहे. गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामा पत्रात लिहिले आहे की, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून या मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS