Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यापार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा कटिबद्ध

माँ वैष्णव पॅलेस येथे व्यापारी मेळाव्यात उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री श्री तिरथसिंहजी रावत यांचे प्रतिपादन

बीड प्रतिनिधी - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथसिंहजी रावत व मध्य प्रदेश टुरिझम कार्पोरेशन चेअरमन विनोदजी गोठिया हे सोमवारी बीड जिल्हा दौर्यावर

ठाकरेंना मोठा धक्का! सरकारमध्ये येताच फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय | LokNews24
पुण्यात पोलीसांच्या नाकावर टिच्चून गुंडागर्दी | LOKNews24
भुजबळ मंत्रीऐवजी विदूषक वाटतात!

बीड प्रतिनिधी – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथसिंहजी रावत व मध्य प्रदेश टुरिझम कार्पोरेशन चेअरमन विनोदजी गोठिया हे सोमवारी बीड जिल्हा दौर्यावर आले असता त्यांनी एम.आय.डी.सी. येथील मा वैष्णव पॅलेस येथे आयोजित व्यापारी मेळाव्यास भेट देऊन व्यापार्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.
यावेळी कॅट संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्री संतोष सोहनी व शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या व्यापारी मेळाव्यात वरील मान्यवरांसह भाजपाचे बीड जिल्हाअध्यक्ष राजेंद्र मस्के,संघटक देविदास नागरगोजे, जगदीश गुरुखुदे, मनमोहन कलंत्री, जवाहर कांकरिया, रामेश्वर कासट, गजानन चरखा, भास्करराव गायकवाड, प्रमोद निनाळ उपस्थित होते.प्रास्ताविक व सुत्रसंचलन गिरीश सोहनी यांनी केले.यावेळी मनमोहन कलंत्री यांनी व्यापार्यांचे प्रश्न मांडले तर सत्यनारायण लोहिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाची प्रगती झाली असे विचार मांडले. तसेच मध्य प्रदेश टुरिझमचे चेअरमन विनोदजी गोटिया यांनी देशाचा विकास आणि भारत विश्वगुरु होऊ शकतो ते फक्त भाजपा मुळेच आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या विकासासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी विविध योजना राबवल्या व पूर्णत्वास नेल्या असे विचार मांडले.उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथसिंहजी रावत यांनी सर्वांच्या समस्या उद्योगातील अडचणी जीएसटी संदर्भातील अडचणी जाणून घेऊन या सर्व समस्या सोडवण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे असे यावेळी बोलताना सांगितले. कॅटचे मराठवाडा अध्यक्ष आणि मेळाव्याचे आयोजक संतोष सोहनी यांनी यावेळी व्यापारी बांधवांचे प्रश्न येणार्या काळातील समस्या याबाबत योग्य उपाय योजना कराव्यात असे प्रतिपादन केले शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांनी सर्वांचे आभार मानले.यावेळी उपस्थित सत्यनारायण कासट, अशोक मंत्री, भगीरथ चरखा, पंकज भुतडा, कमलेश रांदड, पंकज धुत,बालप्रसाद जाजू, अभिषेक चरखा, जयकिशोर बियाणी, हरीओम धुप्पड, अक्षय लड्डा, काबराजी, चेतन मुनोत, थिगळे काका, ओम मिटकरी भिमु मिटकरी, राजू राठी, राजू नाटकर, अमित मंत्री, राजकुमार मालपाणी, नितीन मंत्री, संकेत टवानी, अमित बाहेती, अजय जाजू, सुनील लाहोटी, संजय सोहनी, निलेश मालपाणी, नंदकिशोर लड्डा, पुरुषोत्तम मालपाणी, मदनलाल अग्रवाल, केदार मानधने, आदेश नहार, शहागडकर विलास, महेश लड्डा, प्रसाद रांदड, ओमप्रकाश रांदड, महेश बोरा, व सर्व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS