Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करहर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी; 151 दात्यांनी केले रक्तदान

करहर : शिबिराचा शुभारंभ करताना नितीन बानगुडे-पाटील शेजारी माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, एकनाथ ओंबळे, संतोष मोहिते व मान्यवर. करहर / वार्ताहर : शिवसेना

जुन्या रागातून भैरोबा मंदिरासमोर मनसेच्या कार्यकर्त्याचा खून
कोंडवे येथील गाडे वाड्याला आग; घरातील साहित्य जळून नुकसान
महावितरणच्या प्रादेशिक नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘सवाल अंधाराचा’ सर्वोत्कृष्ट; कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ द्वितीय

करहर / वार्ताहर : शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना करहर विभाग आणि बालाजी ब्लड बँक सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 151 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.
करहर, ता. जावळी येथे हिंदु हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त करहर विभागातील शिवसैनिकांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन सातारा-सांगली संपर्क प्रमुख तथा शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथमतः बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी जावळीचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, सातारा जावळी संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, जिल्हा प्रमुख संतोष मोहिते, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख विक्रांत गावडे, तालुका प्रमुख विश्‍वनाथ धनावडे, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्‍वर गोळे, शिवसेना म्हसवे गट समन्वयक संजय बेलोशे शिव सामर्थ्य सेना तालुका अध्यक्ष उमेश दुर्गावळे, उपाध्यक्ष रवी पार्टे, युवा नेते नितीन गोळे आदी उपस्थित होते.
शिवसेना उपनेते प्रा. बानगुडे-पाटील म्हणाले, शिवसेनेच कार्य नेहमीच समाजभिमुख राहिले आहे. येथे राजकारणापेक्षा समाजकार्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. शिवसेना आणि रक्तदान शिबिर याचे अनोख नाते आहे. मुंबई सारख्या शहरात शिवसेना शाखा नेहमी रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून रुग्णसेवेला अग्रक्रम देत आली आहे. आज बाळासाहेबांच्या ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त करहर विभागातील शिवसैनिकांनी रक्तदान शिबीर आयोजित करून शिवसेना प्रमुखांचे विचार आचरणात आणले आहेत.
रक्तदान शिबिरात 151 दात्यांनी सहभाग नोंदवित रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना हेल्मेट आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी संदीप (बापू) गोळे, प्रकाश गोळे, बाळू यादव, विभाग प्रमुख गणेश गोळे, हनुमंत गोळे, नारायण पार्टे, आनंदराव पोफळे, सचिन पवार, तुळशीदास पार्टे, निलेश यादव तसेच करहर पंचक्रोशीतील सर्व शाखप्रमुख, उपशाखा प्रमुख तसेच आजी-माजी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

COMMENTS