Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिमुकल्या वेदांतचा स्मशानात वाढदिवस साजरा

अंधश्रद्धा दूर करण्यासाठी राबवला धाडसी उपक्रम

कोपरगाव तालुका ः वेदांत हा अवघ्या नऊ वर्षाचा ! तो इयत्ता चौथीत शिकतो पण तो धाडशी आहे.या वयात तो समाजसेवा म्हणून दर रविवारी स्मशानभूमीत स्वच्छता क

कालिका फर्निचरच्या ग्राहकांना विमा संरक्षणाचा लाभ
एक कोटींहून अधिक मुस्लिम भाजपसोबत जोडणार
संगमनेरात गौ ग्राम परिक्रमा काढून वसुबारस साजरी

कोपरगाव तालुका ः वेदांत हा अवघ्या नऊ वर्षाचा ! तो इयत्ता चौथीत शिकतो पण तो धाडशी आहे.या वयात तो समाजसेवा म्हणून दर रविवारी स्मशानभूमीत स्वच्छता करतो. या वर्षी तर त्याचा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करण्यात आला. समाजातील लोकांच्या मनातील भुतांची अथवा स्मशानभूमीची भिती घालविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
यामुळे परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. वेदांत सचिन चांदगुडे हा कोपरगांव तालुक्यातील चासनळी येथील रहिवाशी आहे. सामाजिक उपक्रमात असलेल्या मायभूमी सोशल फाउंडेशनचा तो सर्वात छोटा सदस्य आहे. सुरुवातीला गंमत म्हणून वडिलांसोबत दर रविवारी ग्रामस्वच्छता करण्यासाठी जाणारा वेदांतला सामाजिक कामाचा लळा लागला. प्रथम स्मशानात गेल्यावर तो जराही घाबरला नाही.तेव्हापासुन तो दर रविवारी सुट्टीच्या दिवशी स्मशानभूमीत इतर सदस्यांसोबत स्वच्छता करु लागला. इतकेच नाही तर मागच्या दिवाळीत स्मशानभूमीत  इतरांसोबत त्याने फराळ सेवन करुन लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केला. नुकताच त्याचा वाढदिवस स्मशानभूमीत केक कापून साजरा करण्यात आला.उपस्थित सर्वांनी तेथेच केक सेवन केला. त्याचे वडील सचिन दिलीपराव चांदगुडे यांनी या निमित्ताने दहा वडाच्या झाडाचे रोपण केले. हे वृक्ष वाढविण्याची व संगोपण करण्याची जबाबदारी ग्रामस्थ सुकदेव माळी यांनी उचलली. यावेळी उपस्थित संतोष पर्‍हे, शाम कासार, कैलास माळी, विजय चव्हाणके, बाळासाहेब सैंदाणे, सुनील चांदगुडे, आढाव, सुरेश आष्टेकर, शांताराम बिरुटे, बबन गाडे, भाऊसाहेब चांदगुडे, प्रथमेश चव्हाणके आदींनी वेदांतला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या अनोख्याच धाडशी उपक्रमाची चासनळी भागात चर्चा सुरु आहे.

मला स्मशानाची अजीबात भीती वाटत नाही. माझ्या मित्रांना या उपक्रमाची माहिती झाल्यावर त्यांनी माझे कौतुक केले. वडीलांच्या सोबत मी असेच सामाजिक काम करणार आहे. वेदांत चांदगुडे

COMMENTS