Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यातील बिरोबाचा यात्रोत्सव उत्साहात

अकोले/प्रतिनिधी ः बिरोबाचा जयघोष करून डोक्यावर तेलाने भरलेले पेटते कठे घेऊन उघडया अंगावर तेलाचे चटके सहन करीत, कौठवाडी तालुका अकोले येथील बिरोबाच

दलित अत्याचारासंदर्भात तक्रारी आता कमी झाल्या ; अल्पसंख्याक आयोग अध्यक्षांचा दावा
आधारकार्डवरील नाव आणि बँक खात्याची माहिती अचूक नोंदवा
ओमायक्रॉनने अकोलेकरांचे वाढवले टेन्शन…

अकोले/प्रतिनिधी ः बिरोबाचा जयघोष करून डोक्यावर तेलाने भरलेले पेटते कठे घेऊन उघडया अंगावर तेलाचे चटके सहन करीत, कौठवाडी तालुका अकोले येथील बिरोबाच्या मंदिरात भाविकानी नवसपूर्ती केली. अक्षय तृतीयानतंर येणार्‍या पहिल्या रविवारी कौठवाडी या आदिवासी गावात श्री. क्षेत्र बिरोबा महाराजाची घाटाखाली कठा यात्रा भरते.
साकीरवाडी गावातून मानाची काठी वाजत-गाजत येते. या काठीचा मंदिराला स्पर्श होताच बिरोबा की जय म्हणत मानाचा भोईर यांचा कठा पेटायला सुरवात होते. श्री. बिरोबाला नवीन कपडे घातले जातात. नैवेद्य दाखवून गौधळ घातला जातो. मंदिरामध्ये घंटानाद, संबळ, ढोल, ताशा, डफ, सनई, धोदाना ही वाद्य एकाच वेळी वाजविली जातात. नंतर कठे पुढे व त्यामागे पेटते कठे मिरवायला सुरवात होते. कठा म्हणजे बुडाच्या बाजुने कापलेली घागर, कापलेला भाग या घागरीत आतील बाजुस उघडा करून ठेवतात. खैर, जांभुळ, साग, सादडा अशा पेटणार्‍या वनस्पतीची धलपाटे घागरीत उभी भरतात. त्यात कापूर टाकला जातो. बाहेरच्या बाजुने अष्टगंध, चंदनाच्या रंगाने सुदर नक्षी काढतात. रानचाभ्याच्या फुलांनी कठा सुंदर सजावतात. ते कठे बिरोबाच्या मंदिरासमोर मांडले जाऊन भाविक कठ्यामध्ये तेल ओततात. डोक्यावर पेटलेले कठे…त्यामधुन निघणारी अग्नीज्वाला…मिनिटा-मिनिटांनी ओतले जाणारे तेल…बिरोबाचा जयघोष…घंटानाद, सबंळ, पिपाणी, धोदाणा, ताशा अशा पारंपारिक वाद्याचा दुमदुमणारा आवाज आणि उघड्या अंगावर तापलेले तेल ओघळत असते. तरी देखील भाविक फेर्‍यामागुन फेर्‍या मारत असतात. मनोकामना पूर्ण झालेले भाविक असे कठे घेऊन येतात. येथे भाविकाला चटका बसत नाही. कोणतीही इजा होत नाही. शंभर वर्षीपासून अधिक कठे पेटवण्याची कौठवाडी गावात परांपरा असून बिरोबाच्या देवास्थानामुळे आमच्या गावची खुप भरभराट झालेली आहे.कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही असे संयोजक दत्तात्रय भोईर यांनी सागितले. या यात्रेत पशुहत्या केली जात नाही. त्यामुळे प्रत्येक घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. अकोले तालुक्याचा आदिवासी परिसर, ठाणे, नगर, नाशिक मुबंई, सांगली, सातारा, पुणे, कल्याण येथील भाविक मोठया संख्येने यात्रेसाठी हजेरी लावतात. कौठवाडी व साकिरवाडीत विविध समाजाच्या पेठाची नावे असलेली दगड आहेत.बारा बलुतेदारांना या गावात आश्रय मिळायाचा म्हणून त्याच्या या खुणा आजही कायम आहेत.रात्रभर उत्साहात व पेटत्या कठ्यांच्या उजेडात परिसर उजळून काढणारी ही यात्रा पाहण्यासाठी, तसेच देवाला नवस बोलण्यासाठी राज्यभरातून लोकांनी येथे गर्दी केली होती. तर राजूर पोलिस स्टेशनचे स.पो.नि गणेश इंगळे व कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.  

COMMENTS