मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे मागील काही दिवसांपासून बरेच चर्चेत होते. हे स्टार कपल आपल्या मुलीच्

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे मागील काही दिवसांपासून बरेच चर्चेत होते. हे स्टार कपल आपल्या मुलीच्या जन्मामुळे खूप आनंदात आहे. बिपाशा बसूने नोव्हेंबरमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. या जोडप्याने त्यांच्या मुलीचं नाव ‘देवी बासू सिंह’ ठेवलं आहे. अनेकदा बिपाशा आपल्या मुलीचे गोंडस फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. बिपाशाने मुलीचा असाच क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. व्हिडीओमध्ये गुलाबी फुलांच्या ड्रेसमधली देवी ही खेळताना पाहायला मिळत आहे. तसेच ती जमिनीवर रांगतानाही दिसतेय. तर बिपाशाने पिवळ्या रंगाचा सूट घातलेला असून तीही अगदी सुंदर दिसत आहे. शिवाय, या व्हिडीओला तिने ‘छोटी सी आशा’ हे गाणं जोडलं आहे. देवीचा हा फोटो व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून याला लाइक्स आणि कमेंट मिळाल्या आहेत. बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांच्या मुलीची गोंडस झलक शेअर करत असतात. ‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते. त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. वयाच्या 43 व्या वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये बिपाशाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. बेबी बंप फ्लाँट करत तिने फोटोशूटसुद्धा केलं होतं.अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001 मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
COMMENTS