Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉस फेम प्रियंका चहर चौधरीवर चोरीचा आरोप

‘बिग बॉस १६’ फेम अभिनेत्री प्रियंका चहर चौधरीवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. एका डिझायनरने प्रियंकावर कपडे चोरल्याचा आणि स्टाईल कॉपी केल्याचा आरो

जगातील सर्वात मोठ्या रॉकेटचा प्रक्षेपणानंतर हवेत स्फोट
वनवासी बांधवांचे संस्कृती रक्षणाचे कार्य समाजापुढे आणावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
कोंबड्या पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड… पहा व्हिडिओ…

‘बिग बॉस १६’ फेम अभिनेत्री प्रियंका चहर चौधरीवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. एका डिझायनरने प्रियंकावर कपडे चोरल्याचा आणि स्टाईल कॉपी केल्याचा आरोप आहे. तिच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो, असं म्हटलं जातंय. प्रसिद्ध डिझायनर इशिताने दावा केला आहे की प्रियांकाने तिचे ब्रँडेड कपडे चोरले आणि तिची स्टाईलही कॉपी केली.

प्रियंका चहर चौधरीने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टा हँडलवर बेज रंगाचा रफल लेहेंगा परिधान केलेले काही फोटो शेअर केले होते. यानंतर इशिताने दावा केला होता की हे तिच्या ब्रँडचे कपडे आहेत, जे तिने खास डिझाइन केले होते. यानंतर इशिताने ट्वीट करत प्रियंका चहरवर आरोप केले. पण नंतर मात्र तिने तिचं ट्वीट डिलीट केलं होतं. परदेशात स्थायिक असलेली फॅशन स्टायलिस्ट आणि डिझायनर इशिताने प्रियंका चहर चौधरीवर एका ट्वीटमध्ये गंभीर आरोप केले होते. “सायकॉटिक पीआर टीम असलेली ऑब्सेस्ड महिला जी इतरांना त्रास देणे थांबवू शकत नाही. ती विषारीपणाची व्याख्या आहे. तिने इतरांना प्रभावित करण्यासाठी बनावट पर्सनॅलिटी तयार केली आहे,” असं इशिताने तिच्या डिलीट केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

COMMENTS