Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिकनच्या दरात मोठी वाढ

मुंबई प्रतिनिधी - चिकन प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या महागाई वाढत आहे. आता चिकनचे भाव देखील इतर वस्तूंप्रमाणे वधारले आहे. राज्यासह दे

तिसरी लाट आटोक्यात, काळजी करण्याचा विषय नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे | LOKNews24
 आमदार बच्चू कडूंची प्रहार संघटना व मेस्टा संघटना पदवीधर निवडणूक लढणार
धाडसी निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो – अशोक चव्हाण

मुंबई प्रतिनिधी – चिकन प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या महागाई वाढत आहे. आता चिकनचे भाव देखील इतर वस्तूंप्रमाणे वधारले आहे. राज्यासह देशात चिकनच्या किमतीत वाढ झाली आहे. सध्या चिकनचे दर 260 रुपये किलो आहे. कोंबड्यांची आवक कमी होऊन मागणी वाढल्यामुळे चिकनचे दर वधारले आहे. गेल्या सहा महिन्यात ही मोठी दर वाढ आहे. गावरान कोंबडीला जास्ती मागणी असल्यामुळे गावरान कोंबडीचे चिकन महाग झाले आहे. अति उष्णतेमुळे कोंबड्यांचे मृत्यू झाल्यामुळे पोल्ट्री उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. आवक कमी आणि चिकनची मागणी जास्त असल्यामुळे चिकनच्या किमती 260 रुपये किलो झाल्या आहे. येत्या काळात दर अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS