सुपे ः पारनेर तालुक्यातील सुपा जिल्हा परीषद गटातील प्रलंबित विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून ,सर्व कामांना मंजुरी दिली असल्याची
सुपे ः पारनेर तालुक्यातील सुपा जिल्हा परीषद गटातील प्रलंबित विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून ,सर्व कामांना मंजुरी दिली असल्याची माहीती पारनेर तालुका भाजपाचे अध्यक्ष राहुल शिंदे पाटील यांनी सांगितले. विकास कामासंदर्भात माहीती देतांना म्हणाले की, सुपा जिल्हा परिषद गटातील सुपा, हंगा, मुंगशी, शहाजापूर, अपधुप, वाळावणे, रायतळे, अस्तगाव, पिंपरी गवळी, रांजणगाव मशिद, भोयरे गागार्डा, रुईछत्रपती, बाबुर्डी, वाघुंडे बु!!, पळवे बु!!, घाणेगाव, नारायनगव्हाण या गावामधे रस्ते, वीज व्यवस्था, छोटे पुल, घंटागाडी, गावअंर्तगत पाणी पुरवठा, शाळा खोल्यांचे बांधकाम, सभा मंडप, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमि, साठवन बंधारा, सार्वजनिक शौचालय, बंदिस्त गटार, अशा विविध कामांना पालकमंत्री व खासदार सुजय विखे यांच्या मुळेच कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर झाला असल्यामुळे या सर्व कामांना त्वरीत भूमीपूजन होऊन सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुपा गटाचा संपुर्ण विकास झाल्याचे चित्र आज पहावयास मिळेल,उर्ववरीत कामे ही लवकरच पुर्ण होतील असे राहुल शिंद े(पाटील) यांनी सांगितले. आज 4 रोजी राधाकृष्ण विखे पाटील (पालकमंत्री अ.नगर), डॉ. खा. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ज्येष्ठ नेते, काशिनाथ दाते माजी सभापती सा.बा.अहमदनगर यांच्या हस्ते रांजणगाव मशिद येथे तब्बल 82 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. रांजणगाव मधे शिंदे वाडी रस्ता, जवकमळा डांबरीकरण, गावातील गटार, ग्रामपंचायतमधे आरओ बसवने, जवकमळा येथे रोहीत्र बसवणे, धाडगेवाडी पाणी पुरवठा, शिंदे मळा येथे शौचालय असे कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणुन विश्वनाथ कोरडे(प्रदेश कार्यकारणी सदश्य), आश्विणी थोरात(महीला अध्यक्षा भा.ज.पा.), बंडु रोहकले (पारनेर ता.शिवसेना प्रमुख),सागर मैड(सरचिटणीस भा.ज.पा अ,नगर), गणेशजी शेळके (मा.सभापती), राहुल शिंदे (पाटील) (पारनेर ता.अध्यक्ष भा.ज.पा.) दत्ता नाना पवार( अध्यक्ष पारनेर ता.दुध संघ) रांजणगावचे सरपंच बंटी साबळे .बाबा जवक(उपसरपंच),महेश देशमुख, दत्ता लोणकर, शिवाजी शिंदे सेवा सोसायटीचे चेअरमन प्रकाश गाढवे, अनिल जवक, अदी ग्रामपंचायतीचे सदस्य, सेवा सोसायटीचे संचालक, ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन राहुल दादा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले.
COMMENTS