Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा जागेचे बुधवारी भूमिपूजन : प्रा. शामराव पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : जगविख्यात थोर साहित्यिक , साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन आ. जयंत

फलटण तालुक्यातील खाणीत परप्रांतियाचा मृत्यू
पोपट कुंभार बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मनीत
शाहुनगरी फौंडेशनचा महाराणी येसूबाई पुरस्कार पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना जाहीर

इस्लामपूर / प्रतिनिधी : जगविख्यात थोर साहित्यिक , साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन आ. जयंत पाटील यांच्या हस्ते तर श्रीमती सावित्रीबाई साठे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. 29 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4 वाजता होणार असल्याची माहिती राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनी अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
शामराव पाटील म्हणाले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाळवा तालुक्यातील मातंग व इतर समाजातील लोकांनी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी आंदोलन उभे केले होते. या आंदोलन ठिकाणी आ. जयंत पाटील यांनी भेट देऊन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा राजारामबापू बँक उभारून देणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार राजारामबापू बँकेने जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडे रीतसर पत्रव्यवहार, ठराव सादर करून पुतळा उभारण्यासाठी परवानगी घेतली आहे. हा पुतळा नगरपालिका समोरील सांगली जिल्हा बँकेच्या शेजारी असलेल्या आयर्लंड पुतळ्याच्या जागी उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याची उंची 9 फूट असून पुतळ्याचा चबुतरा 8 फुटाचा असणार आहे. असा एकूण 17 फूट उंचीचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती स्मारक असणार आहे.
प्रा. शामराव पाटील म्हणाले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारावा यासाठी कपाळमोक्ष आंदोलन केले. यामध्ये रामभाऊ देवकुळे, बाबुराव बडेकर, भास्कर चव्हाण यांना क्रांती योध्दा म्हणून सन्मानीत करण्यात येणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हा ब्रांझ या धातूचा असणार आहे. तज्ञ शिल्पकार यांच्याकडून मॉडेल पुतळ्या पुतळ्याची तपासणी करण्यात आली आहे. हा पुतळा 1 ऑगस्ट 2026 पूर्वी उभारण्यात येणार आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिवशी या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येईल. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा शहराच्या वैभवात भर टाकणारे आहे. आतापर्यंत राजारामबापू बँकेने 40 ठिकाणी पिकप शेड, पेठनाका पोलीस चौकी तसेच सामाजिक उपक्रमात भाग घेतला आहे. अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारण्याची संधी बँकेला मिळाल्याने बँकेला अभिमान आहे.
पत्रकार परिषदेला राजारामबापू बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, संचालक सुभाष सूर्यवंशी, संजय पाटील, माजी नगरसेवक शहाजीबापू पाटील, खंडेराव जाधव, संदीप पाटील, शंकरराव चव्हाण, पिरअली पुणेकर, सचिन कोळी, बाळासाहेब पाटील, दलित महासंघाचे शंकर महापुरे, अरुण कांबळे, डॉ. सुधाकर वायदंडे, उत्तम चांदणे, विकास बल्लाळ, तानाजी साठे, रामभाऊ देवकर, सौरभ साठे, शशिकांत वायदंडे, संदीप अवघडे, कबीर चव्हाण उपस्थित होते.

COMMENTS