Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीमराव वाघचौरेंच्या प्रयत्नांना यश; बीडमध्ये सायन्स पार्क आणि नाट्यगृहासाठी निधी मंजूर

बीड । प्रतिनिधीराजकारणात केवळ आश्वासने देणे सहज असते, पण ती पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि सातत्य आवश्यक असते, हे बीडमधील प्रभाग क्रमांक 13 चे माजी नग

नवीन वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तानसह 9 सामन्यांमध्ये फेरबदल
पिसाळलेल्या कुञ्याने चाव्यानेे आठ गायींसह शेळीचा मृत्यू
‘वंचित’चे पुन्हा एकला चलो रे ?

बीड । प्रतिनिधी
राजकारणात केवळ आश्वासने देणे सहज असते, पण ती पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि सातत्य आवश्यक असते, हे बीडमधील प्रभाग क्रमांक 13 चे माजी नगरसेवक भीमराव वाघचौरे यांनी सिद्ध केले आहे. वाघचौरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बीड शहरासाठी दोन महत्वाचे प्रकल्प मार्गी लागले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाघचौरे यांच्या मागणीला दखल दिली असून, बीड शहरात भव्य सायन्स पार्क उभारण्यासाठी 28 कोटी आणि स्व. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या दुरुस्ती आणि सुधारणासाठी 8 कोटी 19 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
यंदाची नगर परिषद निवडणूक लढवताना वाघचौरे यांनी आपल्या वचननाम्यात बीडकरांना आश्वासन दिले होते की, शहरात आधुनिक सायन्स पार्क आणि तारांगण उभारले जाईल. निवडणूक संपल्यानंतरही त्यांनी या प्रकल्पांसाठी सतत पाठपुरावा केला. वाघचौरे म्हणाले, माझे स्वप्न साकार झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे मनःपूर्वक आभार. भीड दौर्‍यासाठी विमानतळावर असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकार्‍यांना फोन करून निधी मंजुरीचा तातडी आदेश दिला. त्यांचे म्हणणे होते, मी बीडला पोहोचेपर्यंत निधी मंजुरीचा आदेश निघावा. यामुळे 8 कोटी 19 लाख रुपयांच्या नाट्यगृह सुधारणा निधीचा शासन निर्णय (ॠठ) व्हॉट्सपवर ताबडतोब बीडमध्ये पोहोचला. अजित पवार यांचा हा वेग आणि तत्परता स्थानिक स्तरावर ’बुलेट ट्रेन’ स्टाईल म्हणून चर्चित झाली. भीमराव वाघचौरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला सायन्स पार्क धानोरा रस्त्यावरील पंढरी येथे उभारला जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून यासाठी 28 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मध्यभागी तारांगण व विज्ञान उद्यान: अंतराळातील रहस्ये उलगडणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहिती केंद्रे: -ख आणि आभासी तंत्रज्ञानावर आधारित चार विशेष केंद्रे विभाग: मानवी इतिहास, निसर्गशास्त्र, पर्यावरण या विषयांवर स्वतंत्र दालने तारांगण: ग्रह, तारे, उल्का, धूमकेतू, आकाशगंगा आणि नेब्युला यांची माहिती मराठीत बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्थेत होते. तुटलेल्या खुर्च्या आणि असुविधांमुळे कलाकार व रसिक मोठ्या अडचणीत होते. वाघचौरे यांनी हा मुद्दा पुढे ठेवून प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि अजित पवारांनी तत्काळ प्रतिसाद दिला. सुधारित नाट्यगृह: वातानुकूलित यंत्रणा आधुनिक सोयीसुविधा संपूर्ण रूपांतरणामुळे कलाकार आणि रसिकांसाठी सुलभता  भीमराव वाघचौरे यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे बीडमधील विद्यार्थी, रसिक आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे प्रकल्प शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक वैभवात भर घालणार आहेत.

COMMENTS