Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिमाई माझी मायबाप भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेशाहू महाराजांच्या विचारावरच माझी राजकीय कारकीर्द -आ.संदीप क्षीरसागर

बीड प्रतिनिधी - समोर बसलेली भिमाई माझी मायबाप आयुष्यभर माझं जीवन या दोन अस्मिताच्या मार्गावर मी देणार,महामानव ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगणं

बीड जिल्हा निष्ठेच्याच पाठी-आ.संदीप क्षीरसागर
भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संस्थाने निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध -आ.संदीप क्षीरसागर
प्रस्थापितांची सत्ता उधळून लावण्यासाठी शेतकरी परिवर्तन महाआघाडीला साथ द्या-आ.संदीप क्षीरसागर

बीड प्रतिनिधी – समोर बसलेली भिमाई माझी मायबाप आयुष्यभर माझं जीवन या दोन अस्मिताच्या मार्गावर मी देणार,महामानव ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगणं दिले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यात चवदार लोकशाही देणारे महामानव बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राची अस्मिता आहेत फुले-शाहू-आंबेडकर यांच्या आदर्श विचारावरच माझी राजकीय कारकीर्द असुन ज्याप्रमाणे महापुरुषांनी जन उद्धाराचे जे कार्य याचा हेवा सर्व देशाला असून तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीद वाक्य जनतेच्या मनात रुजविले याचप्रमाणे तळागाळातील जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचण्यासाठी मी काम करीत असून महापुरुषांच्या आणि आपल्या आशीर्वादामुळे मला यात यश येत आहे असे वक्तव्य आ.संदीप क्षीरसागर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले संयुक्त जयंती निमित्त आयोजित केलेले भीम गीत गायन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली.
सामूहिक बुद्ध वंदना घेऊन महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक आ संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, काँग्रेस रवींद्र दळवी, अर्जुन क्षीरसागर ,अरुण भोले ,वैजनाथ तांदळे कल्याण आखाडे, अशोक वाघमारे,ज्येष्ठ पत्रकार नामदेवराव क्षीरसागर, संपादक अजित वरपे,  संतोष मानूरकर, दत्ता देशमुख, संजय मालानी, बालाजी मारगुडे, अशोक तावरे, सुनिल क्षीरसागर, सुभाष चौरे, दिनेश लिंबेकर, अक्षय केंडे, वैभव स्वामी, व्यंकटेश वैष्णव, प्रचंड सोळंके,उधदव मोरे यांच्यासह सर्व जाती-धर्मातील युवक, युवती, महिला, पुरुष, जेष्ठ नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. मागील काही वर्षांपासून आ.संदीप क्षीरसागरांच्या संकल्पनेतून कुठल्याही प्रकारची वर्गणी न घेता महापुरुषांची जयंती साजरी करत असून, या जयंतीच्या कार्यक्रमास देश-विदेशातून कलाकार आपल्या कलेची सादरीकरण करतात. या जयंतीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली असून याचाच भाग म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भीम गीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले होते. याप्रसंगी शुभेच्छा देताना सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून आ. संदीप भैया क्षीरसागर महापुरुषाच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असून बीडमध्ये आल्याशिवाय जंयती झाले सारखे वाटत नाही. माझे हे बीडमध्ये येण्याचे तिसरे वर्ष आहे. गायनामध्ये शिंदे बाण्याला तोड नाही तर बीड मतदारसंघात आ.संदीप भैया क्षीरसागर यांनी केलेल्या विकासकामांना तोड नाही.महणुन आज आ.संदीप भैय्यासाठी लिहिलेले खास गाण्यावर  कोण करणार नाही त्याची सर भैय्या एक नंबर या गाण्यावर बीडकर थिरकले.  बीड मतदार संघाचे विकासासाठी आ.संदीप भैया यांना साथ आणि हात द्यावा असेही त्यांनी यावेळी म्हटले.

COMMENTS