Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारामतीमध्ये रंगणार नणंद विरूद्ध भावजय सामना

सुप्रिया सुळेविरोधांत सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार?

पुणे/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटांकडून निवडणूक रणनीती आखण्यात येत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारां

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट
आमदार रोहित पवार यांच्या कामामुळे जनतेचा विश्‍वास
डोंबिवलीतील मोहने नागरी आरोग्य केंद्र परिसरात गोवरचा उद्रेक स्पॉट 

पुणे/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटांकडून निवडणूक रणनीती आखण्यात येत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाचं समीकरण काय असेल? यावरून चर्चा सुरू आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना बघायला मिळणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बारामतीतून सुनेत्रा पवार लढणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण लोकशाही मानतो. त्यामुळे कुणी ना कुणी माझ्याविरोधात लढणारच आहे. त्यामुळे अशा निर्णयाचे पूर्ण ताकदीने स्वागत केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझे म्हणणे आहे की, आमच्याकडे तरी लोकशाही आहे. दिल्ली काय दडपशाही सुरू असते, हे संपूर्ण देश पाहत आहे. पण आमच्याकडे लोकशाहीच आहे. त्यामुळे मला वाटते की, कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. आपण या सगळ्या गोष्टींचा मान-सन्मान केला पाहिजे. भाजप तीन वेळा माझ्या विरोधात निवडणूक लढली. यावेळीही कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. मी लोकशाहीचे मनापासून स्वागत करते. ही लोकशाही जगली पाहिजे. टिकली पाहिजे. आपण अशा सर्व निर्णयांचे पूर्ण ताकदीने स्वागत केलेच पाहिजे. कुणीतरी विरोधात लढलेच पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे.  

COMMENTS