Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनातील भाव हा भक्तीचा केंद्र बिंदू 

डॉ तुळशीराम महाराज गुट्टे : विजयनगरला श्रीमद् भागवत कथेस प्रारंभ

नाशिकः  भक्ती हा पाचवा पुरुषार्थ मानला जातो.भक्ती केल्याने मन प्रसन्न होते. भक्ती आपल्या जीवनात सकारात्मक विचार निर्माण करते. मनातील भाव हा भक्ती

पुणे काँगे्रसमध्ये पुन्हा गटबाजी चव्हाट्यावर
देश सुरक्षा आणि हनी ट्रॅप
भाजपमध्ये मला संपवण्याचा प्रयत्न : पंकजा मुंडे

नाशिकः  भक्ती हा पाचवा पुरुषार्थ मानला जातो.भक्ती केल्याने मन प्रसन्न होते. भक्ती आपल्या जीवनात सकारात्मक विचार निर्माण करते. मनातील भाव हा भक्तीचा केंद्र बिंदू असतो. भक्ती करण्यासाठी समर्पण व त्याग महत्वाचा असल्याचे विचार संत साहित्याचे अभ्यासक डॉ तुळशीराम महाराज  गुट्टे यांनी व्यक्त केले. 

पंचवटीतील नवीन आडगाव नाका येथील विजय नगर कॉलनीत प्रणित मिञ मंडळातर्फे आयोजित श्रीमद् भागवत कथेस प्रारंभ झाला. पहिल्या दिवसाच्या कथेत डॉ गुट्टे महाराज भाविकांना निरूपण करत होते. ते म्हणाले की, भागवत कथा श्रवणाने जीवनात परिवर्तन घडते.

जीवन जगत असताना अनेक प्रकारचे दुःख माणूस भोगत असतो. त्या दुःखापासून माणूस मुक्त होतो. कथा जीवन जगायला प्रेरणा देते. कथामृत हे ब्रह्मानंदा पेक्षा श्रेष्ठ आहे.भगवान श्रीकृष्ण तीनही प्रकारचे ताप नाहीसे करतात. भागवत कथा श्रवणाने मनःशांती मिळते. जीवनाला एक निश्चित दिशा मिळते. शुद्ध मनाने केलेले कर्म ही सुद्धा भगवंताची पुजाच असल्याचे डॉ गुट्टे महाराज यांनी सांगितले. संगीत साथ नवनाथ महाराज राठोड व मच्छीन्द्र महाराज राठोड यांनी दिली.यावेळी बाबासाहेब सानप, मुरलीधर अकोटकर, वसंतराव पुंड, प्रणित सानप, यांच्यासह प्रणित मित्रमंडळाचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS