अहमदनगर/प्रतिनिधी ः येथील भरतनाट्यम् डान्स स्टुडिओने महिलांच्या कला-गुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळवून दिले आहे, मंगळागौर उत्
अहमदनगर/प्रतिनिधी ः येथील भरतनाट्यम् डान्स स्टुडिओने महिलांच्या कला-गुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळवून दिले आहे, मंगळागौर उत्सवाच्या माध्यमातून आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे, यातून आपली संस्कृतीही पर्यावरणपपूरक सण-समारंभातून प्रतित होते. विसरत चाललेली चाली-रिती, पंरपरा नवीन पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी आशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन रसिक गु्रपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांनी केले. भरतनाट्यम् डान्स स्टुडिओच्या वतीने शहरातील आम्रपाली गार्डन येथे आयोजित मंगलागौरच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी शिवशाही पुनवर्सन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक आयएएस अधिकारी गुलाबराव खरात, सुफी गायक पवन नाईक, लेखक दिग्दर्शक प्रा.चंद्रकांत जोशी, अंजली नृत्यालयाच्या संचालिका सुरेखा डावरे, आयोजिका मानसी देठे, सिमा देशमुख, विक्रम देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.
या मंगळागौर कार्यक्रमात 70 महिलांनी सहभाग घेतला होता. या महिलांना महिनाभर प्रशिक्षण देण्यात आले होते. मंगळागौर उत्सव 2023 या कार्यक्रमात विविध पारंपारिक मंगळागौर मधील नृत्य व खेळाचे सादरीकरण झाले. यामध्ये ‘नाच ग घुमा…, किस बाई किस…, घागर घुमु दे…, गुणाचे गौरी.., सासुरवाशीन सून…, राधा रुसली सुंदरी…, खुर्ची का मिर्ची… यासारख्या मंगळागौरचे नृत्याबरोबर लाट्याबाई लाट्या…, आगोटा..पागोटा…, कोंबडा… फुगड्या यासारखे खेळ महिलांनी सादर केले. तसेच उपस्थित महिलांही यात सहभागी होत नृत्य व खेळाचा आनंद घेतला. या महिलांनी मंगळागौरच्या गाण्यावर नृत्य व खेळ सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी निता गडाख, पल्लवी खरात, किरण खरात यांनीही गायन करत आपली कला सादर केली. त्यांना तबल्यावर गुलाबराव खरात यांनी साथसंगत दिली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या शिबीरातील सहभागींना प्रशिस्तपत्रक देण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींनी भरतनाट्यम् डान्स स्टुडिओच्या प्रशिक्षिका मानसी देठे, प्रतिभा देठे यांचा विशेष गौरव करण्यात आला. शिबीर यशस्वीतेसाठी सुविधा मार्केटचे संचालक संतोष शिंदे, ज्ञानेश्वर गाडे, कॅडसेंटर डिनेट सिस्टिम ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंटच्या संचालिका मंदाताई धनवे, 32 स्माईल दातांचा दवाखानाच्या डॉ.गितांजली सोनवणे, डॉ. प्राजक्ता सावडेकर, स्मार्ट ड्रेपरीच्या वैशाली पठारे, पॅथकाईल लॅबचे रणजित रामफळे, सुनील शिंदे आदिंचे सहकार्य लाभले.
मान्यवरांकडून कौतुकांचा वर्षाव – भरतनाट्यम् डान्स स्टुडिओच्या प्रशिक्षक मानसी देठे यांनी या माध्यमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देत, त्यांच्या कलागुणांना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल, त्यांचे कार्यकर्माच्या प्रमुख मान्यवरांनी विशेष कौतुक केले. या उत्सवातील खेळ, गाणी, नृत्य यांचे प्रशिक्षण देऊन त्यांचे अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे. यातून महिलांतील कला-गुणांना वाव मिळाला, याचा आनंद महिलांच्या चेहर्यावर झळकत होता.
COMMENTS