Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडारदरा धरण 70 टक्के भरले

अकोले ः  भंडारदरा पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्या घाटघर, रतनवाडीत धो-धो पाऊस सुरू आहे. काल सायंकाळी संपलेल्या 36 तासांत तब्बल 1407 दलघफू पा

उपोषण केल्याच्या रागातून पाच एकर ऊस पेटविला
घारगावमध्ये शेकडा ब्रासची रॉयल्टी आणि कोट्यवधींचे उत्खनन
Sangamner : रुग्णवाहिका चालकांनी रुग्णांची लूट केल्यास परवाना रद्द करणार (Video)

अकोले ः  भंडारदरा पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्या घाटघर, रतनवाडीत धो-धो पाऊस सुरू आहे. काल सायंकाळी संपलेल्या 36 तासांत तब्बल 1407 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. हा हंगामातील विक्रम आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा रात्री 10 वाजण्याच्या सुमारास 7698 दलघफू (70 टक्के) झाला आहे. पाणलोटात मंगळवारपासून आषाढसरींचे तांडव सुरू असल्याने डोंगर दर्यांमधील धबधब्यांनी आक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. ओढे-नाल्यांना पूर आला असून ते धरणात विसावत आहेत. पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्या घाटघर आणि रतनवाडीत तुफानी पाऊस सुरू असल्याने जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. भातखाचरांमधून पाणी वाहत आहे. डोंगरदर्या, रस्ते धुक्यांनी अंधारून गेले आहेत. या पावसामुळे जनजीवन गारठून गेले आहे. पाऊस सुरू असल्याने आज आणखी पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे.

COMMENTS