Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूरकर डेंग्यु, चिकनगुनियाने त्रस्त

डास निर्मूलन फवारणी त्वरित करण्याची मागणी ः सरपंच भरत साळुंके

बेलापूर ः बेलापूर बु. व ऐनतपूर गावामध्ये विविध साथीचे रोग व आजार पसरत आहे. डासाचा त्रासामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात आजा

कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन उत्साहात
अहमदनगर दक्षिणेतून डॉ. अशोक सोनवणे लढणार लोकसभा
चौरंगीनाथ महाराजांच्या यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ

बेलापूर ः बेलापूर बु. व ऐनतपूर गावामध्ये विविध साथीचे रोग व आजार पसरत आहे. डासाचा त्रासामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहे. त्यामुळे डेंगू, मलेरिया, आणि चिकनगुनिया, यासारखे आजार होत आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेलापूर, ऐनतपूर गावात वाड्या, वस्त्यावर प्रतिबंधात्मक डास फवारणी त्वरित करण्यात यावी, यासाठी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र खटोड, ग्राम पंचायत सदस्य भरत साळुंके, ग्राम पंचायत सदस्य रमेश अमोलिक, यांनी ग्रामसेवक मेघशाम गायकवाड यांना निवेदन दिले, आणि गावात त्वरित डास निर्मूलन फवारणी करावी असे आवाहन केले आहे.

COMMENTS