अहमदनगर/प्रतिनिधी : अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असताना मारहाण करणार्या पोलिस अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी बेलवंडी येथील पोलिस मित्र नवनाथ मोरे
अहमदनगर/प्रतिनिधी : अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असताना मारहाण करणार्या पोलिस अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी बेलवंडी येथील पोलिस मित्र नवनाथ मोरे यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. नवनाथ मोरे (राहणार एरंडोली म्हसोबा मळा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा नगर) यांनी पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते सन 2011 पासून पोलीस मित्र म्हणून काम करीत आहे. दि.7 रोजी भाऊ छगन बबन मोरे यांच्याशी शेळी चारण्यावरुन शाब्दिक भांडणे झाली. त्याचा राग येऊन त्याने त्याच दिवशी सायंकाळी 6.40 मिनिटांनी एन.सी. (नंबर 119/2022) बेलवंडी पोलिस ठाण्यात दाखल केली, त्यामुळे बेलवंडी पोलीस स्टेशनचे पीआय यांनी दि. 8रोजी 4 वाजता फोन केला व नवनाथ मोरे यास पोलीस स्टेशनला बोलवले. फोन आला त्यावेळी त्यांनी फोनवरच दमदाटीची भाषा केली व म्हणाले, तू काय लय माजला काय? लगेच आला पाहिजे, असे म्हणून फोन कट केला. त्यामुळे मोरे यांनी आई व पत्नीला समवेत घेऊन असे तिघेजण पोलीस स्टेशनला गेले. तेव्हा पोलिस निरीक्षक दुधाळ यांनी कुठलीही चौकशी न करता, तू खूप माजला आहे, असे म्हणून मारहाण केली व म्हणाले की, याला आत घ्या व वाखारे काय माझा बाप आहे काय? त्याला फोन करून सांगतो काय? तुला दाखवतो असे म्हणून आत नेले व मोरे याचे पूर्णपणे कपडे काढले व पी. आय. दुधाळ व 4 पोलीस कर्मचारी यांनी मोरेला आई व पत्नीसमोरच मारहाण केली. त्यामुळे या मारहाणीचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व न्याय मिळवून देण्यात यावा, अशी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी मोरे यांनी केली. आपल्याला न्याय न मिळाल्यास येत्या दि.10 मार्च रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, पोलिस मारहाणीविरोधात उपोषणाचा इशारा दिल्याने बेलवंडी परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे.
COMMENTS