Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाजार समिती भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी साथ द्या-कुंडलिक खांडे

बीड प्रतिनिधी - बीड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गेल्या अनेक वर्षापासून शेतकर्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. भ्रष्टाचाराचे कुरण बनले

अतिक्रमणांवर पडतोय हातोडा… रस्त्यांचा श्‍वास होतोय मोकळा..
मुख्यमंत्री शिवसेनेचा ; सुत्र मात्र राष्ट्रवादीकडे
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता

बीड प्रतिनिधी – बीड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गेल्या अनेक वर्षापासून शेतकर्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या या समितीच्या माध्यमातून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी यांनी अनेकांना पाठीशी घातलेले आहे. शेतकर्यांची फसवणूक करुन अनेक घोटाळे हे त्यांच्याच सांगण्यावरुन करण्यात आले असल्याचा आरोप करत शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी शेतकर्यांना न्याय देण्यासाठी आणि बाजार समिती भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी शेतकरी परिवर्तन महाआघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले.
    शनिवार दि.22 रोजी श्रीक्षेत्र ईश्वर भारती संस्थान बेलेश्वर बेलगाव येथे लिंबागणेश पंचायत समिती गटाची भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, शिवसंग्राम, वंचित ब. आघाडी, आरपीआय,रासप प्रणीत शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,शिवसंग्रामचे प्रभाकर कोलंगडे, भाजपाचे सर्जेराव तांदळे, चंद्रकांत फड, अनिल घुमरे,देवीदास नागरगोजे, ग्राम पंचायत मतदार संघ आर्थिक दुर्बल घटक उमेदवार गणेश उगले, दिपक काळे, शामराव पडुळे, पंडित माने, शरद झोडगे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले की, बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक घोटाळे झालेले आहेत. भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात बोकाळलेला आहे. भ्रष्ट लोकांच्या तावडीतून मार्केट कमिटी मुक्त करून शेतकर्यांना न्याय देण्यासाठी सर्व पक्षांची एकत्रित महाआघाडी तयार झाली असून, एक दिलाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत लढा देवू.गेली वीस वर्षापासून बीड मार्केट कमिटीचे जे संचालक आहेत. त्यांच्याच काळामध्ये भ्रष्टाचार बोकाळला. त्याच लोकांना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी दिली आहे. मार्केट कमिटीतील भ्रष्टाचाराचा अड्डा मोडीत काढण्यासाठी शेतकर्यांच्या पोरांना मतदार बांधवांनी संधी देऊन बीड मार्केट कमिटी भ्रष्टाचार मुक्त करा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि शिवसंग्रामचे प्रभाकर कोलंगडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

COMMENTS