Homeताज्या बातम्यादेश

बळीराजा आंदोलनावर ठाम

शेतकरी आणि पोलिसांत दुसर्‍या दिवशीही झटापट

नवी दिल्ली ः शेतकर्‍यांनी विविध मागण्यांसाठी राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच करतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे या शेतकर्‍यांना पोलिसांनी अणि निमलष

अशोक’ चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न
म्हसवड शहरात दहा दिवसांतून एकदा पाणी; म्हसवड नगरपरिषदे विरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
शेतकरी लाचार रहावा म्हणून राज्यकर्ते प्रयत्नशील : राजु शेट्टी

नवी दिल्ली ः शेतकर्‍यांनी विविध मागण्यांसाठी राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच करतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे या शेतकर्‍यांना पोलिसांनी अणि निमलष्करी दलांच्या जवानांनी शंभू सीमेवर रोखून धरले आहे. त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट होतांना दिसून येत आहे.  
राजधानीवर मोर्चाचा बुधवारी दुसरा दिवस आहे. शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवरून हरियाणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील. किसान मजदूर मोर्चाचे समन्वयक सर्वनसिंह पंढेर यांनी सांगितले की, ते कोणत्याही परिस्थितीत दिल्लीला जाणार आहेत. त्याच वेळी, हरियाणातील 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंदी 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद, सिरसा येथे हे निर्बंध कायम राहणार आहेत. याआधी मंगळवारी सकाळी 10 वाजता शेतकरी पंजाबमधून हरियाणासाठी रवाना झाले. दुपारी बाराच्या सुमारास शेतकरी पंजाब-हरियाणाच्या शंभू, खनौरी आणि डबवली सीमेवर एकत्र पोहोचले. बहुतांश शेतकरी शंभू सीमेवर पोहोचले. शेतकरी येथे पोहोचताच हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यास सुरुवात केली. मशिनची रेंज कमी असताना ड्रोनद्वारे अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. येथील रस्त्याच्या मधोमध ठेवलेले सिमेंटचे स्लॅब शेतकर्‍यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने हटवले. यानंतर हरियाणा पोलिसांनीही रबर गोळ्या झाडल्या. यावेळी अंबाला पोलिसांच्या डीएसपीसह 5 पोलिस कर्मचारी आणि अनेक शेतकरी जखमी झाले. येथील घग्गर पुलाच्या काठावर लावण्यात आलेले सुरक्षा कठडे शेतकर्‍यांनी तोडले.

शेतकर्‍यांना गुन्हेगारांसारखी वागणूक देऊ नका ः स्वामीनाथन – भारतरत्न पुरस्कार विजेते आणि कृषीशास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन यांची कन्या मधुरा स्वामीनाथन यांनी शेतकर्‍यांना गुन्हेगारांसारखे वागवू नका, असे वक्तव्य केले आहे. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याबद्दल भारतीय कृषी संशोधन संस्थेने एक समारंभ आयोजित केला होता, या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत असताना मधुरा स्वामीनाथन यांनी शेतकर्‍यांचे आंदोलन रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून केलेल्या उपाययोजनांवर टीका केली. भारतीय शेतकरी आपले अन्नदाते असून त्यांना अशाप्रकारे गुन्हेगारांसारखी वागणूक देणे योग्य नाही, असे मधुरा स्वामीनाथन म्हणाल्या आहेत.

COMMENTS