औंध / वार्ताहर : भाजप व शिंदे सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई हे कार्यक्षम मंत्री आहेत. त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही अडीच वर्षांत काय केले
औंध / वार्ताहर : भाजप व शिंदे सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई हे कार्यक्षम मंत्री आहेत. त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही अडीच वर्षांत काय केले ते जनतेला सांगा. हे असंवेदनशील सरकार आहे, असे तुम्ही सांगता तुम्ही किती कार्यक्षम होता. हे अडीच वर्षांच्या काळाच जनतेला कळले आहे. तुम्ही कॅबीनेट मंत्री होता तेंव्हा शंभूराज देसाई हे राज्यमंत्री होते असे असतानाही त्यांनी आणलेला निधी बघा व तुम्ही जिल्ह्यात आणलेले एखादे मोठे काम सांगा. असा सवाल कराड उत्तरचे भाजप नेते धैर्यशील कदम यांनी केला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आ. बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या टिकेचा खरपूस समाचार आज धैर्यशील कदम यांनी घेतला.
भाजपा शिंदे सरकारमधील राज्य उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडून झालेल्या टिकेला धैर्यशील कदम यांनी उत्तर दिले. कदम म्हणाले, अडीच वर्षे सरकारमध्ये असताना तुम्ही लोकांवर खोट्या तक्रारी दाखल केल्या. विरोधकांच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत नेले विरोधकांना नोकर्या मिळून दिल्या नाहीत. आघाडी सरकारच्या निष्क्रीयतेमुळेचे कराड उत्तरचे विद्यमान आमदार हे अडीच वर्षे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. या अडीच वर्षात त्यांनी केलेले एखाद्या दर्शनीय काम सांगावे. जिल्ह्याचे सोडा मतदार संघातील किती प्रश्न मार्गी लावले यावर बोला, असे धैर्यशील कदम म्हणाले.
पालकमंत्री होता तेंव्हा किती माया कमावली याचा लेखा जोखा जनतेला द्या. मंत्री देसाईंवर टिका करण्यापूर्वी स्वत:च्या मनाला विचारा. तुम्ही किती कार्यक्षम आहे हे कळले. मांजराला वाटते आपण डोळे झाकून दुध पितो म्हणजे आपल्याला कोण पहातच नाही, अशा प्रकारची वृत्ती जनतेने पाहिली आहे. कराड उत्तरमधील ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक झाली का? तारळी नदीवरील उपसा सिंचन योजना मंत्री देसाई यांनी परवानगी घेतली आहे. मात्र, कराड उत्तरमधील पाली, तारळेतील 10 वर्षांची 100 हेडची मागणी आहे. त्याला तुम्ही पालकमंत्री असताना का परवानगी मिळाली नाही. त्यामुळे हिम्मत असेल तर समोरासमोर व्यासपीठ लावा, असे आवाहन धैर्यशील कदम यांनी केले.
COMMENTS