Homeताज्या बातम्यादेश

गोध्रा जळीतकांडातील 8 दोषींना जामीन

नवी दिल्ली : गुजरातमधील गोध्रा इथे 2002 साली झालेल्या रेल्वे जळीत कांडातील आठ दोषींना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. या गुन्हेग

RRR चित्रपटातील नाटू – नाटू या गाण्याला मिळाला ऑस्कर अवॉर्ड
मातृभक्ती आणि देशशक्ती यांचे संस्कार सामर्थ्य वाढावे : हभप संतोष महाराज
मेंढेगिरी समिती नगर-नाशिक शेतकर्‍यांचा बळी घेणार का?

नवी दिल्ली : गुजरातमधील गोध्रा इथे 2002 साली झालेल्या रेल्वे जळीत कांडातील आठ दोषींना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. या गुन्हेगारी कटात सहभागी असलेल्या अन्य चार जणांना मात्र त्यांच्या गुन्ह्याचे स्वरूप पाहून जामीन नाकारण्यात आला.  सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. गोध्रा रेल्वे स्थानकावर 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्स्प्रेसचे काही डबे जाळण्यात आले होते. त्यात किमान 58 जणांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल उसळली होती. गोध्रा जळीत कांड प्रकरणी स्थानिक न्यायालयाने 2011 साली 12 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती आणि 63 जणांची निर्दोष मुक्तता केली होती. ट्रायल कोर्टाने ही शिक्षा कायम ठेवली होती.

COMMENTS