अमरावती प्रतिनिधी - मागील 12 दिवसांपासून आमदार रवी राणा(Ravi rana) आणि आमदार बच्चू कडू(Bachu Kadu) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू होते . दरम्यान रविवा
अमरावती प्रतिनिधी – मागील 12 दिवसांपासून आमदार रवी राणा(Ravi rana) आणि आमदार बच्चू कडू(Bachu Kadu) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू होते . दरम्यान रविवारी मध्यरात्री मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बच्चू कडू व रवी राणा यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर रवी राणा यांनी शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो असे सांगितले . परंतु आमदार कडू यांनी सांगितले , की कार्यकर्त्यांची मनं दुखावली आहेत , त्यामुळे आमचे कार्यकर्तेच या प्रकरणात निर्णय घेतील आणि त्यासाठीच आज अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील प्रहारचे पदाधिकारी , कार्यकर्ते अमरावती शहरात आले, अमरावतीच्या नेहरू मैदानामध्ये मै झुकेंगा नही चे बॅनरबाजी सभेच्या ठिकाणी झळकले तसेच मुख्य बॅनर वर हातोडा आणि ‘ मै झुकेगा नही ‘ आहे तर याच ठिकाणी सर्व कार्यकर्ते या प्रकरणातील पुढील भूमिका ठरवणार आहे.
COMMENTS