पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा : महापौर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा : महापौर

पुणे : यंदाचा गणेशोत्सव कोविड 19 च्या नियमांचे पालन करुन पर्यावरणपूरक उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करावा, असे आवाहन महापौर उषा ढोरे व आयुक्त राजेश

मंत्रालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न
चांदबिबी महालच्या परिसरात पुन्हा आढळला बिबट्याचा वावर
चोपडा नगरपालिकेकडून कर वसुलीला सुरुवात ; थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट

पुणे : यंदाचा गणेशोत्सव कोविड 19 च्या नियमांचे पालन करुन पर्यावरणपूरक उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करावा, असे आवाहन महापौर उषा ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी शहरवासीयांना केले.

दरवर्षी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उत्साही व आनंदी वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी शाडू माती अथवा कागदी लगद्या यांसारख्या विघटनशील घटकांपासून बनविलेल्या गणेशमूर्तींची स्थापना करावी. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींची उंची 4 फुटापर्यंत असावी. तर, घरगुती गणेश मूर्तींची उंची 2 फुटापर्यंत असावी. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP) पासून बनविलेल्या गणेश मूर्तींच्या विसर्जनास प्रतिबंध आहे. घरगुती आरास व देखाव्यांसाठी प्लास्टिक, थर्माकोल व पर्यावरणास हानिकारक वस्तूंचा वापर करू नये, असेही आवाहन त्यांनी केले.

COMMENTS