Homeताज्या बातम्यादेश

डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारापूर्वी आढळले जिवंत

आसाम प्रतिनिधी - सहा महिन्यांच्या गरोदर असलेल्या महिलेला अचानक प्रसुती कळा सुरू झाल्या. पतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिथे महिलेने

शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांचे उपोषण
अरूण गवळीची तुरुंगातून होणार कायमची सुटका ?
संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसे स्मारक भव्यदिव्य स्वरुपात उभारावे : उपमुख्यमंत्री अजित पवार

आसाम प्रतिनिधी – सहा महिन्यांच्या गरोदर असलेल्या महिलेला अचानक प्रसुती कळा सुरू झाल्या. पतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिथे महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, बाळाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. इतकंच नाही, तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्रही दिलं. दरम्यान, बाळावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबिय स्मशानभूमीत पोहचले असता, बाळ जिवंत असल्याचं त्यांना कळालं. यानंतर कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयातधाव घेत बाळाला पुन्हा उपचारासाठी दाखल केलं. हा धक्कादायक प्रकार आसाममधील सिलचर शहरात घडला आहे. याप्रकरणी बाळाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका खासगी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील सिलचर शहरात राहणारे रतन दास (वय २९) यांच्या पत्नीला बुधवारी प्रसुती कळा सुरू झाल्या. पत्नी सहा महिन्यांची गरोदर असल्याने त्यांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात धाव घेतली.

दरम्यान, गर्भधारणेत समस्या असल्याने आई किंवा बाळ यांच्यापैकी आम्ही एकाचाच जीव वाचवू शकतो, असं डॉक्टरांनी रतन दास यांना सांगितलं. यानंतर रतन दास यांच्या परवानगीनंतर डॉक्टरांनी महिलेची प्रसुती केली. यावेळी बाळाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. इतकंच नाही, तर त्याचं मृत्यू प्रमाणपत्रही दिलं. यानंतर रतन दास यांच्यासह कुटुंबियांनी बाळावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बाळाला घेऊन स्मशानभूमी गाठली. पण तिथे गेल्यानंतर बाळ जिवंत असल्याचं त्यांना कळालं. यानंतर त्यांनी पुन्हा रुग्णालयात धाव घेत बाळाला उपाचारासाठी दाखल केलं.

COMMENTS