Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूर महाविद्यालयाला नॅककडून बी प्लस

बेलापूर ः येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूरला राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक, बंगलोर) केंद्रीय समितीच्या

बेलापूर महाविद्यालयातील मीनल शेलार, श्रुती सराफ यांना सुवर्णपदक
बेलापूर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन
बेलापूर महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट उत्साहात

बेलापूर ः येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूरला राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक, बंगलोर) केंद्रीय समितीच्यावतीने नुकतीच बी प्लस ( बी+) ग्रेड प्रदान करण्यात आली आहे. उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी तसेच महाविद्यालयाची भौतिक व गुणात्मक प्रगती व्हावी यासाठी पाच वर्षातून एकदा नॅक समितीच्यावतीने महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जाते.
सन 2017 मध्ये बेलापूर महाविद्यालयाचे प्रथम मुल्यांकन झाले होते. यावर्षी नॅकच्या सेकंड सायकलचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले. नॅक परिषदेच्या केंद्रीय समितीने महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक सोयी सुविधा, विद्यापीठीय परीक्षांचे निकाल, ग्रंथालय, कार्यालयीन सेवा, प्राध्यापकांची गुणवत्ता, संशोधन कार्य व विस्तार कार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम अभ्यासक्रम निर्मितीतील सहभाग, सुसज्ज इमारत आदी बाबींचे मूल्यमापन करून महाविद्यालयास बी प्लस श्रेणी दिली आहे. हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असून अहमदनगर येथील डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचा राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवत्तापूर्ण महाविद्यालय पुरस्कार मिळालेला आहे. नॅक पुनर्मूल्यांकनात बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकनाना साळुंके, उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, खजिनदार हरिनारायण खटोड, सचिव अ‍ॅड शरद सोमाणी, सहसचिव दिपक सिकची, विश्‍वस्त अ‍ॅड. विजय साळुंके, बापुसाहेब पुजारी,नंदूशेठ खटोड, भरत साळुंके, रविंद्र खटोड, चंद्रशेखर डावरे, नारायणदास सिकची,प्रेमा मुथा, राजेंद्र सिकची, प्रा. हंबीरराव नाईक, सुविद्या सोमाणी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जी.पी.कोकाटे, नॅक समन्वयक प्रा.एस.एस.विधाटे, अंतर्गत गुणवत्ता समिती समन्वयक डॉ.बी.एन.पवार, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक एस.जी.शाहीर, सर्व  शिक्षकेतर कर्मचारी, सर्व आजी व माजी विद्यार्थी,पालक वर्ग, सर्व तंत्रज्ञ, कारागीर, पेंटर,सर्व कष्टकरी,समस्त ग्रामस्थ आदि सर्व घटकांनी अनमोल सक्रिय सहभाग दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उच्च शिक्षण विभाग, प्राचार्य फोरम, सर्व प्राध्यापक संघटना,विद्यार्थी संघटना , सर्व दैनिके,विविध संस्था आदिंकडून बेलापूर महाविद्यालयाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

COMMENTS