केज प्रतिनिधी - केज शहरातील अतिरिक्त जिल्हा व सञ न्यायालय आवारात तोडलेल्या वडाच्या झाडाचे खोडे लावुन ते अतिशय योग्य पद्धतीने संगोपन अड.दिनकरराव स
केज प्रतिनिधी – केज शहरातील अतिरिक्त जिल्हा व सञ न्यायालय आवारात तोडलेल्या वडाच्या झाडाचे खोडे लावुन ते अतिशय योग्य पद्धतीने संगोपन अड.दिनकरराव सपाटे यांच्या प्रयत्नातुन करण्यात आले आहे.
केज येथे अतिरिक्त जिल्हा व सञ न्यायालयासाठी नविन ईमारतीच्या कामाला सुरुवात करताना काही झाडे अडथळा करीत होती.शासनाची रितसर परवानगी घेऊन ही झाडे काढण्याचा निर्णय घेण्यात आला.ही झाडे काढत असताना केज येथील वकील संघातील जेष्ठ मंडळीशी चर्चा करुन खड्डे खोदुन अड. दिनकरराव सपाटे यांनी वडाच्या झाडाचे चारपाच खोडाचे खड्ड्यात लावणी केली.उन्हाळ्यात त्या खोडांना पाणी देऊन त्या झाडाचे संगोपन केले.आता त्या झाडांना कोवळी पालवी फुटली असुन झाडे जगविण्याचा खरा आनंद अड. दिनकरराव सपाटे यांच्या चेहर्यावर दिसत आहे. केज वकील संघाच्या माध्यमातून न्यायालय परिसरात अतिशय शोभिवंत झाडे व लानची व्यवस्था करण्यात आलेली असुन न्यायालय परिसर फुलांनी व फळांनी बहरुन गेलेला आहे. न्यायालय परिसरात चिंच,जांभुळ,आवळा, आंबे,कडुलिंब व अन्य प्रकारची झाडे बहरली आहेत.ही झाडे जोपासण्यात वकील मंडळी परिश्रम घेत आहेत .
COMMENTS