नाशिक प्रतिनिधी - 'ज्याचा गुरू चरणी निस्सीम भाव,त्याचे मनोरथ पूरवी देव' तसेच निष्कामता निजदृष्टी अनंतपुण्यकोट्यानुकोटी रोकड्या लाभती पाठोवाठीं
नाशिक प्रतिनिधी – ‘ज्याचा गुरू चरणी निस्सीम भाव,त्याचे मनोरथ पूरवी देव’ तसेच निष्कामता निजदृष्टी अनंतपुण्यकोट्यानुकोटी रोकड्या लाभती पाठोवाठीं तैं होय भेटी हरिप्रियांची.. या भागवत ओव्यांचा अर्थ नीट समजून घ्या. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा.मनुष्याचे जन्माला येण्याचे हे एकच कारण आहे. तसे देवाला जन्माला येण्याचे तीन कारणे आहेत.ते म्हणजे साधूंचे रक्षण,दुष्टांचा नाश,आणि धर्माची स्थापना या तीन कारणांसाठी देवाचा अवतार होतो.आणि वाढावया सुख,भक्ती,भाव,धर्म कुळाचार,नाम विठोबाचे या सहा कारणांसाठी संतांचा जन्म होत असतो.याच प्रमाणे निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांनी देखील जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतला.बाबाजींनी शेवटच्या श्वासापर्यंत निष्काम कर्मयोग साधत जनकल्याण केले.असे प्रतिपादन उत्तराधिकारी अनंत विभूषित अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी केले. कठोर तपस्वी,निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज
यांचा ३४ वा पुण्यतिथी सोहळा उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरनेने व प्रमुख उपस्थितीत नाशिक शहरात तपोवन येथे आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्या दरम्यान महाजपानुष्ठान, १०८ कुंडात्मक कार्यसिद्धी महायज्ञ,अखंड नंदादीप, हस्त लिखित नामजप,भागवत पारायण,नामसंकीर्तन,अभिषेक श्रमदान, प्रवचन,सत्संग या बरोबरच रोज पहाटे ब्रम्हमुहूर्तावर नित्यनियम विधी,ध्यान,प्राणायाम,महाआरती आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याची सांगता श्रीक्षेत्र नाशिक शहरातील तपोवन येथे विविध क्षेत्रातील मान्यवर व साधू-संत-ब्राम्हण-अतिथी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.कार्यक्रमाच्या सांगते प्रसंगी पहाटे नित्य नियम विधी, परमपूज्य बाबाजींच्या चरण पादुकांचा अभिषेक,पालखी मिरवणूक,संत,ब्राम्हण व अतिथी पूजन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर काशी येथील महामंडलेश्वर श्री श्री १००८ भवानीनंदन यतीजी महाराज,जम्मू काश्मीर येथील महामंडलेश्वर दिव्यानंद सरस्वती महाराज,श्री १०८ महंत स्वामी सेवागिरीजी महाराज,स्वामी लक्ष्मणगिरीजी महाराज यांसह आश्रमिय संत,ब्रम्हचारी तसेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भूमरे,नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या पत्नी अनिताताई भुसे, अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले, वैजापुरचे आमदार रमेश बोरनारे,नाशिकच्या आमदार सरोज अहिरे,उत्तर प्रदेशचे माजी आमदार संतोष यादव,रामराज्य युवा यात्रेचे प्रमुख प्रदोष चव्हानके यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर संत उपस्थितीत होते.यावेळी भाविकांना मार्गदर्शन करतांना उत्तराधिकारी अनंत विभूषित अध्यात्म शिरोमणी समर्थ सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी सांगितले की,जय बाबाजी भक्त परिवार देव-देश-धर्मासाठी कार्य करत आहे.त्यात प्रामुख्याने व्यसनमुक्त व संस्कारक्षम तरुणपिढी होण्यासाठी भक्त परिवार यापुढेही अधिक प्रभावीपणे कार्य करत रहाणार आहे.स्वदेशी वस्तू वापरा व देशी गायीचे पालन करा.भविकांनी आपल्या हितासाठी नेहमी जागृत रहायला हवे.बाबाजींनी सुरू केलेल्या जपानुष्ठान परंपरेत मोठी शक्ती असून या परंपरेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनाला योग्य दिशा मिळणार आहे.आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक असल्याने मुलांना बालवयातच योग्य संस्कार देणे गरजेचे आहे.कुठलेही व्यसन करू नका. दुर्लभ असा मनुष्य जन्म लाभला आणि जगदगुरू बाबाजीं सारखे शिव अवतारी सदगुरू लाभले हे आपल्या सर्वांचे सर्वात मोठे भाग्य आहे.आई-वडिलांची सेवा करा,नित्य नियम विधी वाचा,भागवत वाचा, श्रमदान परंपरेत सहभागी व्हा असेही यावेळी उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी सांगितले.यावेळी प्रचंड जयघोषात हजारो जपानुष्ठान करणाऱ्या साधकांच्या मौनव्रताची सांगता करण्यात आली. यावेळी बाबाजींच्या आदेशाने उपस्थित प्रत्येक भविकाने व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी कृतीतून प्रयत्न करण्याचा संकल्प केला. जगदगुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या ३४ व्या पुण्यतिथी निमित्त दिवसभरात लाखो भविकांनी बाबाजींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
COMMENTS