आविष्कारचा पत्रकार सन्मान सोहळाईश्वरपूर / प्रतिनिधी : जगात आणि देशात लोकशाहीची गळचेपी चालू असून हुकूमशाही प्रवृत्ती झपाट्याने वाढत आहेत. अशा क

आविष्कारचा पत्रकार सन्मान सोहळा
ईश्वरपूर / प्रतिनिधी : जगात आणि देशात लोकशाहीची गळचेपी चालू असून हुकूमशाही प्रवृत्ती झपाट्याने वाढत आहेत. अशा कठीण परिस्थितीत कशी पत्रकारिता करायची? हा प्रश्न आहे. हा काळ पत्रकारांची परिक्षा घेणारा आहे, अशी भावना माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी उरुण ईश्वरपूर येथे पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात बोलताना व्यक्त केली.
येथील अविष्कार कल्चरल ग्रुप व वाळवा तालुका मराठी श्रमिक पत्रकार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वाळवा तालुका व मिरज तालुक्यातील पश्चिम भागातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे मानद सहसचिव अॅड. धैर्यशील पाटील हे समारंभाचे अध्यक्ष होते. आविष्कारचे अध्यक्ष प्रा. कृष्णा मंडले, उपाध्यक्ष राजेंद्र माळी, कार्याध्यक्ष भूषण शहा, प्रा. प्रदीप पाटील, सचिव विजय लाड, खजिनदार विश्वास कदम, प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपट पाटील, कार्याध्यक्ष शंकर पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
आ. पाटील म्हणाले, अमेरिकेने एका देशाच्या राष्ट्राध्यक्षालाच पळवून नेला आहे. त्यांचा कॅनडाला आपले राज्य बनविण्याचा प्रयत्न आहे. मात्र, या देशातील स्वाभिमानी जनता अमेरिकेतील कोणतीही वस्तू खरेदी करत नाही, अमेरिकेला जात नाहीत. चीनही तैवान आणि छोटी-छोटी राष्ट्र गिळंकृत करू शकते. सध्या जगात लोकशाही पुढे प्रश्न चिन्ह उभा आहे. बाळशास्त्री जांभेकर हे आद्य पत्रकार तसेच थोर समाजसेवक होते. त्यांनी लोकशिक्षण, प्रबोधनाबरोबर समाज सुधारण्यासाठी मोठे काम केले आहे. आमच्या चांगल्या कामास आपले नेहमी सहकार्य व साथ मिळाली आहे. भविष्यातही सूचना करत चला.
अॅड. धैर्यशील पाटील म्हणाले, वाळवा तालुक्या स सकारात्मक पत्रकारितेची परंपरा आहे. निर्भीडता हा पत्रकारितेचा पाया आहे. ही वाट तशी कठीण आहे. मात्र, आपणास पुढे चालायचे आहे. यावेळी प्रा. अशोक शिंदे, विनोद मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रा. अशोक शिंदे, शांताराम पाटील, धर्मवीर पाटील, युवराज निकम, विनायक नायकल, विश्वास धस, धन्वंतरी परदेशी, सुनील माने, सुनील पाटील, विनोद मोहिते, नितीन पाटील, चंद्रकांत जाधव, दिनेश ऐतवडे, दिलीप क्षीरसागर, अवधूत कुलकर्णी, विठ्ठल दळवी यांच्यासह 110 पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
प्रारंभी कवी प्रा. प्रदीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. खजिनदार विश्वास कदम यांनी आभार मानले. माजी सचिव विश्वनाथ पाटसुते, युवा सदस्य सौरभ सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
आविष्कारचे माजी अध्यक्ष सुनिल चव्हाण, संतोष पाटील, राजवर्धन लाड, डॉ. अतुल मोरे, विनायक यादव, धनंजय भोसले, सचिन पाटील, संजय पाटील, सहसचिव विजय नायकल, बालाजी पाटील, किरण पाटील, विश्वजीत पाटील, हर्षवर्धन घोरपडे, श्रेयस पाटील, विशाल पाटील, अजय थोरात तसेच प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष निवास पवार, सचिव धनंजय राजहंस, सहसचिव नितीन पाटील, खजिनदार मारुती पाटील व पत्रकार उपस्थित होते.

COMMENTS